Home क्राईम महानिरक्षकांच्या पथकाचा नगर मध्ये छापा २० लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक पोलीस अनभिज्ञ

महानिरक्षकांच्या पथकाचा नगर मध्ये छापा २० लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक पोलीस अनभिज्ञ

सुपा दि.१८ मे
नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने अहमदनगर पुणे महामार्गावरील वाघुंडे शिवारात हॉटेल सौरभ मागे छापा टाकून सुमारे 20 लाख 70 हजार रुपयांचा चोरी करून विक्री करिता साठवलेला मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर पुणे महामार्गावर गॅस टाक्या, दारू, स्टील लोखंड यांच्या चोऱ्या करून त्याची इतर बाजारात विक्री करणाऱ्यांची एक मोठी टोळी कार्यरत होती. रात्रीच्या वेळेस महामार्गावरील वाहने लुटून त्यातील माल चोरून तो एकत्र करून तो विकण्याचा या टोळीचा धंदा होता.

नाशिकच्या  पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाला ही माहिती मिळताच त्यांनी नगर पुणे रोडवर असलेल्या हॉटेल सौरभ च्या मागे छापा टाकून सुमारे 20 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे सुपा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एवढा मोठा मुद्देमाल असूनही सुपा पोलिस स्टेशनला याबाबत काहीच माहिती नव्हते. थेट नाशिकच्या विशेष पथकाने येऊन ही कारवाई केल्याने सुपा पोलिसांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.एवढ्या मोठ्या मुद्देमाल या ठिकाणी असतानाही स्थानिक पोलिसांना याची खबर कशी मिळाली नाही हा एक चर्चेचा विषय सध्या सुपा परिसरात सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version