Home क्राईम पोलिसांना सांगूनही अवैध धंदे बंद होत नाही नागरिकांनी थेट आमदारांनाच जुगार अड्ड्यावर...

पोलिसांना सांगूनही अवैध धंदे बंद होत नाही नागरिकांनी थेट आमदारांनाच जुगार अड्ड्यावर नेले

वर्धा-८ मे
वर्धा शहरामध्ये सजग नागरिकांनी थेट आमदारांनाच जुगार अड्ड्यावर नेऊन परिस्थिती दाखवली आणि सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली.या प्रकरणाची सध्या वर्धा शहरात मोठी चर्चा होत असून वर्धा शहरातील आर्वी नगर भागात अवैद्य धंद्यांचा सुळसुळाट झाला होता. काही स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रारही केली होती मात्र हे धंदे बंद होत नव्हते. पालिकेच्या जागेवर अतिक्रमणे करून अवैध धंदे जोरात सुरू असल्याने नागरिकांनी थेट आमदारांनाच जुगार अड्ड्यावर नेऊन सत्य परिस्थिती दाखवून दिली.

वर्धा शहरातील आर्वी नगर भागात स्ट्रीट लाईटचा शुभारंभ करण्यासाठी आलेल्या आमदारांना नागरिकांनी आग्रह करून या परिसरातील अवैद्य धंदे बंद करणे बाबत कडक भूमिका घ्यावी यासाठी थेट जुगार अड्ड्यावर नेऊन सत्य परिस्थिती दाखवली. यानंतर त्या ठिकाणी पोलिसही धावत आले होते आम्ही धंदे बंद करतो मात्र ते पुन्हा कधी चालू होतात हे समजत नाही असे उत्तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिले.

पहा व्हिडीओ

नगरपालिकेच्या जागांवर अतिक्रमणे करून अवैद्य धंदे सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. याठिकाणी असलेल्या लहान मुलं महिला आणि तरुणांना या अवैध धंदा मुळे त्रास होत असल्याने अखेर नागरिकांनी आमदाराला जुगार अड्ड्यावर बोलून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केलीय

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version