मुंबई दि.८ मे
घटनां मुंबई मधील चारकोप भागातील आहे सध्या सोशल मीडिया वर एक व्हिडिओ व्हायरल होत असून पहाटेच्या सुमारास एका मशिदीवर पहाटेची अजान सुरू असून त्याला प्रतिउत्तर म्हणून एका मनसैनिकाने आपल्या गच्चीवर हनुमान चालीसा लावून मनसेचा झेंडा फडकवताना दिसत आहे मात्र जेव्हा हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आणि पोलिसांनी तपास केला असता यामध्ये एक मोठं ट्विस्ट आले आहे.
कांदिवली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर ज्या दिवशी चा हा व्हिडिओ दाखवला जातो त्या दिवशी मजिद वरून पहाटेची अजान वाजलीच नव्हती. व्हिडीओ मधील अजान ही युट्युब वरून आवाज घेऊन वाजवल्याचा पोलिसांनी दावा केलाय त्यामुळे पोलिसांनी या तरुणा विरोधात भादवी कलम 505 (2) गुन्हा दाखल केला असून तो तरुण अद्याप फरार आहे
पहा व्हिडीओ