Homeक्राईमदागिने चोरणारी महिला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात...चोरीच्या तक्रारी आधीच चोर पकडला कोतवाली पोलिसांची...

दागिने चोरणारी महिला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात…चोरीच्या तक्रारी आधीच चोर पकडला कोतवाली पोलिसांची कामगिरी

advertisement

अहमदनगर दि.१४ मे

असं कधी झालंय का की आपली एखादी मौल्यवान वस्तू चोरीला गेली आणि आपण पोलिसांमध्ये तक्रार देण्यात पोलिसांनी चोरीच्या मौल्यवान वस्तूसह चोराला पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असं घडतं पण ते चित्रपटात नाही तर नगर शहरातील कोतवाली पोलिसांनी अशी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या महिलेला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचे दागिने हस्तगत केले आहे. विशेष बाब म्हणजे दागिने चोरी झाल्याची फिर्याद मूळ मालकांने दाखल करण्यापूर्वीच कोतवाली पोलिसांनी चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोतवाली पोलिसांचे पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना हा गुन्हा उघडकीस आला.

चोरीचे दागिने बाळगल्याप्रकरणी रुखसार असलम शेख (वय २८, नुरानी कॉलनी, जामखेड, हल्ली रा. गजानन कॉलनी, गणेश चौक बोल्हेगाव, अहमदनगर) या महिलेवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुखसार असलम शेख ही महिला चोरी केलेले दागिने विक्री करण्यासाठी बाजारात येणार असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर महिला पोलिसांच्या समक्ष झडती घेतली असता ३५ हजार रुपये किमतीचे दागिने महिलेकडे मिळून आले. दागिने चोरीतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने महिलेची कसून चौकशी करण्यात आली. संबंधीत महिलेने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच, दागिने अडचण असल्यामुळे विक्री करत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता या महिलेने शेजारीच राहणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचे उघड झाले.

कोतवाली पोलीस ठाण्यात संबंधित महिलेवर चोरीचा मुद्देमाल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चोरीच्या घटनेची सविस्तर फिर्याद सौ अर्चना संजय खेडकर, यांनी दिल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान अभय कदम योगेश भिंगरदिवे श्रीकांत खताडे गणेश धोत्रे यांनी केली आहे..

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular