Home राजकारण खा. इम्तियाज जलील कार्यक्रमास्थळी आले आणि आग लागली नगर शहरात घडली घटना

खा. इम्तियाज जलील कार्यक्रमास्थळी आले आणि आग लागली नगर शहरात घडली घटना

अहमदनगर दि.१९ मे
एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील मंगळवारी अहमदनगर शहरातील सर्जेपुरा येथे अहमदनगर शहरातील एम आय एम पक्षाच्यावतीने ठेवलेल्या सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रमाला उपस्थित होते. खा. इमतियाज जलील यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले आणि स्टेजवर जाऊन बसल्या नंतर काही सेकंदाच्या आतच कार्यक्रम स्थळ जवळ असलेल्या रंगभवन इमारतीच्या गच्ची वर मोठी आग लागली होती.

खा. इमतियाज जलील यांचे आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाकडे वाजवले होते त्यावेळी फाटकड्याची थिनगी रंगभवन च्या वर असलेल्या कचऱ्यावर जाऊन पडल्याने वरचा कचरा चांगलाच पेटला होता.याचाच धागा पकडून इम्तियाज जलील यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच या घटनेचा उल्लेख चांगला मजेदार केला आम्ही जिथे जिथे जातो तिथे चांगलीच आग लागते मी अजून भाषणही केले नाही मात्र मी आल्यानंतर लगेच आगीने पेट घेतला हा योगायोग समजावा का, मात्र आम्ही चांगले तेच बोलतो मात्र इतरांना ते आगी सारखे वाटते त्यामुळे आम्ही जिथे जातो तिथे आग लागतेच.

तसेच त्यांनी प्रसारमध्यमांवर हल्ला चढवला आम्ही जेथे जातो त्या ठिकाणी पत्रकार आम्हाला बोलायला सांगतात मात्र आता आम्ही हुशार झालो आहे आता तुम्ही आम्हाला बोलायचं सांगू नका आम्हाला जिथे बोलायचं आणि तिथे योग्य वेळी बोलू आणि योग्य वेळी सर्वांना उत्तर देऊ असा टोलाही त्यांनी विरोधकांचा नाव न घेता केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version