अहमदनगर दि.२७ एप्रिल
अहमदनगर शहरातील नामांकित आयपील सट्टेबाज खुलेआम रोज करोडो रुपयांची उलाढाल करणारा मोहन पोलिसांना सापडत नाही हे विशेष स्थानिक गुन्हे शाखेने अनेक ठिकाणी छापे टाकून आयपीएल सट्टेबाजांना पकडले आहे. मात्र नगर शहरातील नामांकित मोहन नामक सट्टेबाजी करणाऱ्याच्या कॉलर पर्यंत जात का नाही असा प्रश्न समोर येतोय.
बर या सट्टे बाजी करतो हे सर्वांनाच माहिती आहे लाखो करोडो रुपयांची उलाढाल करणारा आणि हजारो तरुणांना कर्जबाजारी करणाऱ्याच्या मानगुटीवर पोलिसांची भीती नसल्यासारखे साध्य शहरात वातावरण सुरू आहे.
त्याच प्रमाणे शहारात अजून जे आयपील बिंगो सट्टेबाजी करणारे म्होरके आहेत त्यांच्यावर सुद्धा मेहेरबानी का? असा सवाल उठतोय मध्य शहरातील पानवाला असेल किंवा कुमार असेल हे सर्वजण पोलिसांच्या नावावर टिच्चून आयपील सट्टेबाजी करत आहेत.