HomeUncategorizedआयपीएलचा बादशाह मोहन,कुमार वर कारवाई कधी?

आयपीएलचा बादशाह मोहन,कुमार वर कारवाई कधी?

advertisement

अहमदनगर दि.26 एप्रिल

अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद करा असे आदेश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच भाजपचे दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यानंतर काही दिवस हे धंदे बंद झाले मात्र काही दिवसांच्या विश्रांतीनंतर हे धंदे पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले आहेत. मात्र आता त्याच्यामध्ये आकडेवारी वाढली आहे. मग हे धंदे बंद का केले गेले हा प्रश्न समोर येतोय. त्यामुळे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असून अनेक तरुण सध्या बिंगो आणि आयपीएल सट्टे बाजी मुळे कर्जबाजारी झाले आहेत. तसेच मटका जुगार यामुळे अनेकांची घरे बरबाद झाल्यामुळे आणि गुन्हेगाराची पाळेमुळे याच ठिकाणावरून घट्ट होत असल्यामुळे अवैध धंदे बंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत असतानाच राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिले होते तर खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट पोलीस प्रशासनावर हप्ते घेण्याचे आरोप केले होते.

त्यामुळे काही दिवस सर्वच धंदे बंद झाले होते मात्र त्यातून आयपीएल आणि बिंगो हे बंद झालेलेच नाही उलट याचे आकडे वाढवून ते जोमाने सुरू असल्याचं दिसून येते. आयपीएल सट्टेबाजी करणारे बोटावर मोजण्याइतके म्होरके शहरात आहेत. मात्र या म्होरक्यांवर हात टाकायला पोलीस का घाबरतात यांचे लागेबंधे नेमके कोणाबरोबर आहेत हे समजू शकत नाही. मात्र शहरातील नामवंत अशा मोहन याचा गाजावाजा एवढा झालाय की त्याच्यावर हात टाकायला कोणीही धावजवत नाही मोहन सारखे आणखीन चार ते पाच जण म्होरके आहेत. मात्र या मोहरक्या पर्यंत कारवाईचा बडगा कधी जाणार आणि तरुणांना आयपीएलच्या विळख्यातून काढण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न कधी करणार याची वाटच फक्त पहावी लागतेय का ? असा प्रश्न आता पडतोय

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular