Homeशहरमुख्य जलवाहिनीचे नळ कनेक्शन तोडल्याच्या रागातून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यास वेदम मारहाण

मुख्य जलवाहिनीचे नळ कनेक्शन तोडल्याच्या रागातून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यास वेदम मारहाण

advertisement

अहमदनगर दि.२५ एप्रिल

अहमदनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभाग असणाऱ्या कामगाराला मारहाण करण्याची घटना घडली असून पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनी वरील पाण्याचे कनेक्शन काढले म्हणून निलेश गायकवाड या कामगाराला मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार जवळ नगर मनमाड रोड वरील बोल्हेगाव भागात घडला असून निलेश गायकवाड यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तोफखाना पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झाले आहेत.

रस्त्याचे काम चालू असताना या ठिकाणी नळाची पाईपलाईन फुटल्याने खोदकाम केल्यानंतर मुख्य जलवाहिनीलाच पाण्याचे कनेक्शन घेतल्याचे लक्षात आल्यानंतर निलेश गायकवाड या कामगाराने ते नळ कनेक्शन तोडले होते. मात्र तोडलेले नळ कनेक्शन पुन्हा मुख्य जलवाहिनीलाच जोडून द्यावे अशी मागणी करत काही तरुणांनी निलेश गायकवाड याच्याबरोबर वाद घातले आणि त्याला मारहाण केल्याचं निलेश गायकवाड यांनी सांगितले. निलेश गायकवाड यांच्यासह महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पहाणी केलीय.

मात्र या प्रकारामुळे एक गोष्ट समोर आली आहे की असे अनेक नळ कनेक्शन मुख्य जलवाहिनीवर असतील आणि त्यामुळेच अहमदनगर शहराला वसंत टेकडी येथे पाणी कमी दाबाने येते आणि त्यामुळे अनेक वेळा शहराचा पाणीपुरठयावर याचा परिणाम होतो त्यामुळे असे मुख्य जलवाहिनीचे नळ कनेक्शन शोधून ते महानगरपालिकेने तोडणे गरजेचे आहे. यासाठी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सर्जिकल स्ट्राईक करणे गरजेचे आहे या मुळे भविष्यकाळात पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular