Homeशहर'अच्छे दिन'चे गाजर दाखवून केंद्राच्या सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्यात...

‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून केंद्राच्या सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्यात वाढत्या महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी काळे झेंडे दाखवणार -गिरीश जाधव शिवसेना (उद्धव ठाकरे)

advertisement

अहमदनगर दि.२३ ऑक्टोबर

मागील सरकारने इंधनामध्ये मोठ्या प्रमाणात दर वाढ केल्यामुळे जनता त्रस्त झाली होती. त्यामुळे
भाजपाला मोठ्या मताने निवडून दिले. २०१४ मधल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचारात भारतीय जनता
पक्षाचे तेव्हाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, यांनी आपल्या पक्षाला केंद्राची सत्ता मिळाल्यास
महागाईवर नियंत्रण आणून, सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन येतील, अशी ग्वाही दिली होती. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि जनतेला चांगले दिवस आणू, या आश्वासनाचाही त्यांना सोयीस्करपणे विसर पडला. त्यांनी दिलेली ग्वाही म्हणजे जनतेची शुद्ध फसवणूक करणारे, सवंग लोकप्रियते-साठी दिलेले आश्वासन होते, हे स्पष्ट झालेलेच आहे. मोदी सरकारच्या कारकिर्दीत महागाई तर कमी झाली नाहीच उलट महागाईच्या वणव्यात तेल ओतायचा उद्योग मात्र या सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढवायच्या सत्राने सुरूच ठेवला. पेट्रोल डिझेलच्या दराने मोदींच्या साक्षीने व सहकार्याने नवा इतिहास रचला. १ जुलै २०१७ पासून देशभरात समान करप्रणाली म्हणजेच वस्तू सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाली. पण, या समान कर प्रणालीतून डिझेल, पेट्रोल मात्र सोयीस्करपणे वगळून केंद्र आणि राज्य सरकारांनीसर्वसामान्य जनतेवर कराची प्रचंड आकारणी करीत लुटीचे धोरण कायम ठेवले आहे. पेट्रोल आणि डिझेलवर जबर कर आकारणी करून प्रचंड महसुली उत्पन्न मिळवायच्या नादात जनतेला महागाईच्या वरवंट्याखाली भरडायचे हे धोरण बदलायला अद्यापही केंद्र सरकारची तयारी नाही. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे गरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे.

दुसरीकडे दिवाळीच्या तोंडावर धान्य, किराणा मालाच्या किंमतीही वाढल्या आहेत. सर्वसामान्य
नागरिक महागाई मुळे भरडला जात असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र ट्रिलियन अर्थावस्थेच्या गप्पा झोडत आहेत. काही मूठभर उद्योगपतींसाठी सरकार काम करत आहे. त्याचा कुठलाही फायदा सामान्यजनतेला होत नाही. हे वास्तव पाहायला पंतप्रधानांना हवेतून थोडे खाली आणणे गरजेचे आहे. महागाईच्या या गंभीर विषयाची जाणीव पंतप्रधानांना करून देण्यासाठी, त्यांचे महागाईकडे लक्ष वेधण्यासाठी २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने निदर्शने करून शांततेच्या व लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असला तरी चारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिलाय

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular