Homeदेशआमदार संग्राम जगताप यांनी घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

आमदार संग्राम जगताप यांनी घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट.कर्नाटक मध्ये जैन धर्माचे जैनाचार्य कामकुमारनंदीजी हत्ये बाबत कठोर कारवाई करण्याची मागणी

advertisement

मुंबई दि.२० जुलै
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे पाच जुलै रोजी जैन धर्माचे जैनाचार्य कामकुमारनंदीजी यांची क्रूर हत्या करण्यात आली होती.जैनाचार्य कामकुमारनंदीजी यांना निरंकार ऊपवास असताना अपहरन करुन इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले व त्यानंतर शरीराचे तुकडे-तुकडे करुन हत्या करुन शरीराचे भाग बोअरवलेमध्ये टाकण्यात आले या हत्यानंतर संपूर्ण भारतामध्ये जैन समाजामध्ये एक संतापाची लाट उसळली असून ठीक ठिकाणी जैन समाजाच्या वतीने हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मोर्चे काढण्यात येत आहेत.

ही घटना अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. तसेच जैनसाधु संपप्रती जैन धर्मियांच्या अस्मिता संवेदनशील भावना असतात आणि वारंवार घडणाऱ्या अशा घटना जैन समाजासाठी आणि सर्व मानवजातीला फारच वेदनादायी मानाला हेलावून टाकणाऱ्या असतात. याचबारोबर मागील काही दिवसांपासून वारंवार प्राचीन जैन तिर्थावर होणारे अतिक्रमण तसेच जैन साधु संताचे विहारादरम्यान घडवून आणलेले अपघात या सर्व बाबी जैन समाजाच्या आस्थेवर घाला घालणाऱ्या आहेत.
सदर हत्येची सी.बी.आय. सखोल चौकशी करण्यात यावी तसेच गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर न्याय द्यावा. तसेच भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची योग्य खबरदारी घेण्यात यावी. तसेच प्राचीन जैन तिर्थावर होणाऱ्या अतिक्रमणांवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात. हत्येच्या घटनेवर कर्नाटक सरकारने या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तात्काळ कारवाई आशा आशयाचे निवेदन मुंबई येथे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आमदार सुनील रिंगटे यांनी दिले असून कर्नाटक सरकारला याबाबत महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील जैन धर्मियांची भावना कळविण्यात यावी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular