अहमदनगर दि.२० जुलै
अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोड वरील एकविरा चौकात चार दिवसांपूर्वी अंकुश चत्तर याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला त्यानंतर दोन दिवसा नंतर त्याचा मृत्यू झाला.या खुनी हल्ला झाला आणि पोलीस प्रशासन खडबडून जागे झाल्या सारखे झाले.शहरातील चौका चौकात नका बंदी करून दुचाकी वाहनाची तपासणी करत दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा लावला.ही कारवाई करणे गरजेचे होते मात्र यात गुन्हेगार कमी सामान्य नागरीकच जास्त भरडत चालले आहे.
त्याचा प्रमाणे आता रात्री अकरा नंतर शहरातील सर्व दुकाने बंद करण्याची कारवाई सुरू असून खुद्द जील्हापोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत.ही गोष्ट खूप चांगली आहे कारण रात्री विनाकारण फिरत नशा करत अनेक टुकार पोर फिरत असतात त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या कारवाई सुद्धा जोरात सुरू आहे.मात्र ही कारवाई सुरू असताना जेथून दारूचा महापूर वाहत आहे त्या ठिकाणी कारवाई करणे गरजेचे आहे.रात्री अकरा वाजता छोट्या मोठे दुकान, हॉटेल दूध विक्रते, रोड वर उभा राहून व्यायावसाय करणारे कुल्फी सँडविच वडे असे खाद्य पदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांना हाकलून दिले जाते मात्र दारू विकणारे मोठं मोठी हॉटेल मात्र पुढून बंद मागून सुरू असतात.या दारूचा स्त्रोत बंद केला तर रात्रीची उशिराची गर्दी कमी होईल ज्या प्रमाणे छोट्या व्यवसायिकांना रात्री अकरा वाजता बंद म्हणजे बंद ची ऑर्डर दिली जाते त्या प्रमाणे दारू विकणाऱ्या मोठं मोठ्या हॉटेल वर मेहेरबानी का केली जाते रात्री उशिरा पर्यंत हे हॉटेल सुरूच राहतात . वडा,कुल्फी,दूध याने चहा याने शरीराचे हानी होत नाही कायदा सुव्यवस्था बिघडत नाही आणि माणूस सरळ घरी जातो मात्र दारू पिऊन अनेक समस्या होतात भांडणे होतात गोंधळ होतो त्यामुळे सामान्य व्यवसायिकांप्रमाणे दारूची मोठी हॉटेल बंद करा तरच रात्रीची कायद्या सुव्यवस्था अबाधित राहील.