अहिल्यानगर दिनांक 23 जुलै
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये कर्जत येथील एका 21 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी किरण काळे यांना अटक केली असून 25 जुलै पर्यंत त्यांना पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

कर्जत येथील एका महिलेने आपल्या नवऱ्याच्या त्रासापासून मुक्त करावे यासाठी किरण काळे यांच्याकडे मदत मागितली होती. किरण काळे यांनी महिलेच्या अशिक्षितपनाचा फायदा घेऊन महिलेबरोबर अहिल्यानगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात शारीरिक संबंध ठेवल्याची फिर्याद पीडित महिलेने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. हे प्रकरण 2023 ते 2024 साला दरम्यान घडली असून. जर याबाबत कोणाला काही सांगितल्यास महिलेला किरण काळे यांनी ठार मारण्याची धमकी दिली होती. किरण काळे हे राजकीय पदाधिकारी असल्यामुळे आणि मोठ्या पदावर असल्यामुळे ती पिडीत महिला प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. 21 जुलै म्हणजेच फिर्याद दाखल करण्याआधी त्या पीडित महिलेने विषारी औषध सेवन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्नही केला होता. ही धक्कादायक माहिती समोर आली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पीडित महिलेने गुन्हा दाखल करण्याआधी मानसिक त्रासातून आणि प्रचंड दडपणा राजकीय दबावाखाली खाली असल्याने 21 जुलै रोजी विषारी औषध सेवन केले होते. याबाबतची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालया दिली आली असून. किरण काळे यांच्या मानसिक त्रासातून आणि दबावा मुळे आपण विष प्रशासन केले असल्याची कबुली पीडित महिलेने पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात चांगलाच दृष्ट आला असून पीडित महिलेला पुणे राजकीय दबाव टाकला होता याचा तपासणी होणे आता गरजेचे आहे.