Homeक्राईमनगरकरांना फसविणारी आंतरराज्य टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद.. बनावट बँक अधिकारी बनून...

नगरकरांना फसविणारी आंतरराज्य टोळी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद.. बनावट बँक अधिकारी बनून बँकेतून कर्ज मंजुर करुन देतो असे म्हणून पैसे उकळणारे पश्चिम बंगाल येथील ४ तर झारखंडचा १ अशा ५ जणांना अटक.

advertisement

अहमदनगर दि. १५ जून

मीरा भाईंदर परिसरात बँक अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करणारी टोळी ही नगरकडे येत आहे अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिरा रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी यांच्या कडून भेटल्या नंतर कोतवली पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनी सतर्कता बाळगून मुख्य बाजारपेठेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले कारण याच ठिकाणी फसवणूक करणाऱ्या लोकांना सावध मिळू शकते कारण या ठिकाणी मोठा व्यापारी वर्ग असतो नुसार पोलिसांच्या निदर्शनास एक गोष्ट आली की नगर शहरातील कापडबाजार,मोचीगल्ली परिसरात तसेच अहमदनगर शहरात विविध ठिकाणी काही लोक हे बँकेतील अधिकारी, कर्मचारी असल्याचे खोटे सांगुन व्यापा-यांना व्यवसायाकरिता कर्ज मंजुर करुन देतो असे म्हणुन त्यांचेकडुन कागदपत्र, बँकेतील चेक घेवुन त्यांना सदर कागदपत्राच्या आधारे फसवेगिरी करत आहेत अशी माहिती मिळाली.

पोलिसांनी या टोळीवर लक्ष केंद्रित केल्यानंतर फसवेगिरी करणाऱ्या टोळीतील एक सदस्य हा कापडबाजार, मोचीगल्ली एका व्यापा-याच्या दुकानात आलेला असून तो टाटा कॅपीटल फायनान्स कडुन आलो आहे असे सांगुन त्या व्यापा-याकडुन त्याचे कागदपत्र तसेच पैसे, चेक, फोटो हे घेवुन त्यांना बनावट कागदपत्रांवर टाटा कॅपिटल फायनान्स कंपनीचे लोन दस्तऐवज तयार करत असल्याची माहिती मिळाली.

. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावून फसवेगिरी करणाऱ्या टोळीतील एका जणाला अलगद पकडले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता नगर शहरातील माळीवाडा येथील अभिषेक लॉज येथून चार साथीदारांना ताब्यात घेतले.

या फसवेगिरी करणाऱ्या टोळीकडे विविध कंपनीचे बँकेतील ओळखपत्र तसेच त्यांचे फोटो असलेले वेगवेगळया बनावट नावाची आधारकार्ड, मोबाईल फोन, तसेच विविध बँकेचे बनावट आयकार्ड, बँकेचे बनावट शिक्के, काही रिमुएबल पेन, असा एकुन ७५०००/- रुपाये किंमतीचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी मोहम्मद अब्दुल कुदस मेहबुब,( वय ३४ रा उर्दु शाळा जवळ ता लखना जिल्हा हजारी बाग राज्य झारखंड) एतेशाम एमडीनईम आलम, (वय ३४ वर्ष रा ३० / २४ राईचारण घोसलाई कोलकत्ता ) अजीज लतीफ शेख अब्दुल, (वय ३४ रा २८/ A मोमीनपुर रोड, कोलकत्त)सतीश कुमार दुर्योधन नायक (वय २६ रा २३४/४ AJC बोस रोड कोलकत्ता पश्चिम बंगाल) गंगा लक्ष्मी सहा, (वय ४५ वर्ष, रा सोनारपुर २४ पडगाना कलकत्ता) यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये भादंवि ४२०, ४७१, ४६८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोसई मनोज कचरे, पोसई मनोज महाजन, पोहेकॉ तनवीर शेख, पोहेकॉ / गणेश धोत्रे, पोना/ योगेश भिंगारदिवे, पोना/रियाज इनामदार, पोना / योगेश खामकर, पोना/ सलीम शेख, पोना बाप्पुसाहेब गोरे, पोकॉ/ अभय कदम, पोकों/संदिप थोरात, पोकॉ/ अमोल गाढे, पोकॉ/ सुजय हिवाळे, पोकॉ/कैलास शिरसाठ, पोकॉ/सोमनाथ राऊत, पोकों / सागर मिसाळ, पोकॉ अतुल काजळे यांनी केली. या कारवाई कामी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील मिरारोड पोलीस स्टेशन जि ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर गायकवाड पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, पोहेकॉ महाकुलकर, पोहेकॉ गाडेकर यांनी केलीय

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular