HomeUncategorizedअहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीवर कोणाची सत्ता

अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीवर कोणाची सत्ता

advertisement

अहमदनगर दि.२९ एप्रिल
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या ताब्यात अली असून 18 पैकी 15 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचे नेते आमदार निलेश लंके माजी आमदार विजय औटी यांच्या पॅनलचे सर्व18 उमेदवार विजयी भाजपचा एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झाला नाही 18 जागांवर महाविकास आघाडी विजयी

बहु चर्चेत असणारी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीवर रोहित पवार यांच्या पॅनलचे नऊ उमेदवार निवडून आले आहे तर आमदार राम शिंदे यांच्या पॅनलचे सुद्धा नऊ उमेदवार निवडून आल्याने या ठिकाणी समसमान आकडेवारी झाली आहे

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विचित्र आघाडी झाल्यामुळे या ठिकाणी मतदारांमध्ये संभ्रम होता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्यासोबत या निवडणुकीत पॅनल उतरवला होता तर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप हे विरोधात होते या ठिकाणी अद्याप मतमोजणी सुरू असून दोन्हीही उमेदवारांचे समसमान उमेदवार विजयी झाले आहेत मात्र अद्याप या बाजार समितीवर कोणाची सत्ता आली हे चित्र स्पष्ट झाले नाही

नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी एक हाती सत्ता मिळवली असून 18 पैकी 18 उमेदवार भाजपचे निवडून आले आहेत तर महाविकास आघाडीला या ठिकाणी क्लीन स्वीप मिळाली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular