अहमदनगर दि.३ डिसेंबर – विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या आवडत्या खेळामध्ये नैपुण्य मिळावे ध्येय,मेहनत व चिकाटीच्या जोरावर क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादित करता येते कुस्ती क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत नगर शहराचे कुस्ती क्षेत्रामध्ये देशपातळीवर नावलौकिक होते ते गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले करिअर करावे भिस्तबाग चौक येथील संभाजी राजे कुस्ती केंद्र येथे मनपा व जिल्हा क्रीडा कार्यालय व अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ आयोजित जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये शहरातील १५० कुस्तीपटूंनी भाग घेतला होता. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असे प्रतिपादन पै. शिवाजी चव्हाण यांनी केले.
भिस्तबाग येथील संभाजी राजे कुस्ती केंद्र मध्ये मनपा, जिल्हा क्रीडा कार्यालय व अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित शालेय जिल्हा कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मा.महापौर बाबासाहेब वाकळे, पै.शिवाजीराव कराळे, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कुस्ती केंद्राचे मार्गदर्शक पै. शिवाजी चव्हाण, पै. नानासाहेब डोंगरे, पै.संतोष भुजबळ, नितीन आव्हाड, निलेश मदने, विकास गीते, मनपा शिक्षण अधिकारी श्री थोरात, साहेबराव सप्रे, गणेश वाकळे, महेश गलांडे, शरद बोरुडे आदी उपस्थित होते.
भिस्तबाग चौक येथील संभाजी राजे कुस्ती केंद्र मध्ये जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेमध्ये १४,१७ व १९ वयोगटातील मुला मुलींचे कुस्तीचे सामने होणार आहेत या स्पर्धेतून विजेते खेळाडू विभागीय पातळीवर खेळण्यासाठी जाणार आहेत यावेळी विविध शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.