Home क्राईम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आयपीएल सट्टेबाजी करणाऱ्या बुकीवर कारवाई.. मोठ्या डॉन...

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आयपीएल सट्टेबाजी करणाऱ्या बुकीवर कारवाई.. मोठ्या डॉन बुकींवर कारवाई कधी?

अहमदनगर दि.१ मे

आयपीएल सामने चालू झाल्यापासून सट्टेबाजी जोरात सुरू आहे मात्र फक्त नव्या नवख्या आणि छोट्या बुकींवर कारवाई होंताना दिसतेय शेवगाव तालुक्यातील आखेगांव येथील मोबाईलवर सट्टा घेणा-या भागनाथ विठोबा खरचंद याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले त्याच्याकडून १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई ३० एप्रिल रोजी करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संतोष शंकर यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,श्रीरामपूर शेवगांव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलीस नाईक संतोष लोढे,पोलीस नाईक सचिन आडबल,पोकॉ/ रोहित मिसाळ,शिवाजी ढाकणे,जालिंदर माने यांनी केली आहे.

जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या बुकिंगवर कारवाई सुरू आहे मात्र शहरातील मुख्य सट्टेबाजी करणाऱ्या म्होरक्यावर कारवाई कधी होणार हा प्रश्न आता समोर येतोय अहमदनगर शहरात डॉन म्हणून वावरणारे ठराविक सट्टेबाजी करणारे बुकी असून त्यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा सट्टा बाजार सुरू आहे छोट्या बुकीला पकडल्या नंतर मोबाईलवरून साखळी काढत गेले तर पोलिसांना मुख्य म्होरक्यां पर्यंत पोहोचणे शक्य आहे.मात्र आता ही कारवाई पोलिसांनी करणे गरजेचे आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version