Home Uncategorized प्रोफेसर कॉलनी चौकातील खाद्यपदार्थ गाडी विक्रेत्यांमध्ये पडली फुट उपोषणाला बसलेलेच विक्रेते आमदार...

प्रोफेसर कॉलनी चौकातील खाद्यपदार्थ गाडी विक्रेत्यांमध्ये पडली फुट उपोषणाला बसलेलेच विक्रेते आमदार संग्राम जगताप यांच्या भेटीला

अहमदनगर दि.१ मे

अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात उभा राहणाऱ्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्यांना जागा मिळावी म्हणून काही खाद्यपदार्थ विक्रेते उपोषणास बसले आहेत मात्र आता या उपोषणकर्त्यांमध्ये फूट पडली असून काही उपोषणकार्त्यांनी आज शहराचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याकडे त्याच परिसरात खाद्यपदार्थ विक्रीसाठी जागा मिळाली म्हणून मागणी केली आहे.

प्रोफेसर कॉलनी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे म्हणून दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने उपोषण करण्यात आले होते त्यानंतर येत्या 14 मे रोजी या ठिकाणी स्मारकाचे भूमिपूजन होणार असून त्यापूर्वी या स्मारकाच्या जागेच्या अवतीभवतीची जागा महापालिकेने अधोरेखित करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केल्यानंतर स्मारकाच्या जागेच्या परिसरात पत्राचे कंपाऊंड करण्यात आले होते.

कंपाऊंडमुळे त्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या गाड्यांना उभा करण्यास जागाच उपलब्ध नसल्याने या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या चालकांनी उपोषणास सुरुवात केली होती मात्र या उपोषणात फूट पडली असून आता आम्हाला त्याच परिसरात योग्य त्या ठिकाणी महापालिकेची जागा मिळावी अशी मागणी खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाडी चालकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन केली आहे.

मात्र या आधी या खाद्यपदार्थ गाडी चालकांच्या विरोधात अनेक वेळा या परिसरातील नागरिकांनी महापालिकडे तक्रारी केल्या आहेत. कारण खाद्यपदार्थांच्या गाड्या लागल्यानंतर या गाड्यांवर खवय्यांची गर्दी होत असते आणि आलेले ग्राहक हे रस्त्यावरच गाडी उभा करत असल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो अनेक वेळा या ठिकाणी वादही झाले आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version