अहमदनगर दि.१ ऑक्टोबर
अहमदनगर शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र चोरांनी मध्यंतरी चांगलाच धुमाकूळ घातला होता रस्त्याने जाणाऱ्या महिलांना हेरून निर्जन ठिकाणी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून घेऊन पळून जाण्याच्या या घटनांमुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले होते.
शैला सिताराम पाटील या आपल्या मैत्रिणीसमोर जात असताना नगर शहरातील सावेडी भागातील जॉगिंग ट्रॅक परिसरात एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने तोडुन ओढुन नेले होते त्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपास करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा तपास सुरू केला.
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाला या गुन्ह्यातील आरोपी हा अहमदनगर शहरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण रोड बायपास चौकात सापळा लावला त्या वेळी दोन संशयित इसम लाल रंगाची पल्सर मोटार सायकलवरुन केडगांव बायपास रोडने मनमाडकडे जात आढळून आले त्यांच्या संशयास्पद हालचाली मुळे पोलीस पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र त्या संशयित इसमांना पोलिसांची चाहूल लागताच दोघांपैकी मोटार सायकल वरील मागे बसलेल्याने उडी मारली आणि धूम ठोकली. मात्र मोटार सायकल चालकास पोलिसांनी पकडल्या नंतर तपास करत असताना तो आरोपी अल्पवयीन आढळून आला तसेच त्याने अहमदनगर जिल्हयात पारनेर, राहुरी, तोफखाना, राहाता, लोणी, श्रीरामपूर, कोपरगांव येथे त्याच्या साथीदारांसह येऊन धूम स्टाईलने मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.
मंगळसूत्र चोरी सह इतर गंभीर आशा आठ गुन्हे अहमदनगर जिल्ह्यात त्याच्यावर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे त्याच्या कडून ६,८०,०००/-रुपये किंमतीचे १३ तोळे ३५ मिलीग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण ८,१०,०००/- रु. (आठ लाख दहा हजार रुपये) किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील साो. पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार आग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, पोसई/ सोपान गोरे, सफी. मनोहर शेजवळ, पोहेकॉ / सुनिल चव्हाण, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, विजयकुमार वेठेकर, पोना/शंकर चौधरी, भिमराज खसे, विशाल दळवी, मच्छिद्र बर्डे, दिलीप शिंदे, पोकों/रणजित जाधव, विजय धनेधर, योगेश सातपुते, आकाश काळे, मपोना. भाग्यश्री भिटे, मपोकॉ. ज्योती शिंदे, चापोहेकॉ संभाजी कोतकर, उमाकांत गावडे यांनी केली आहे