Home क्राईम ‘लव्ह जिहाद’चा कळस…

‘लव्ह जिहाद’चा कळस…

कोल्हापूर दिनांक २४ जानेवारी

‘शादी डॉट कॉम’च्या माध्यमातून एका तरुणाने २५ पेक्षा अधिक महिलांची फसवणूक करीत त्यांचे शोषण केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिरोज निजाम शेख याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याने घटस्फोटित, विधवा महिलांना लक्ष्य करत त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर शहरातील एका घटस्फोटित महिलेने ‘शादी डॉट कॉम’वर नाव नोंदणी केली होती. त्यावरून तिचा मोबाईल नंबर मिळवून फिरोज शेखने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपी फिरोज निजाम शेख ‘shaadi.com’ नोंदणी करत तब्बल २५ महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे यात घटस्फोटित, विधवा महिलांना लक्ष करण्यात आले आहे.

करणारा कोंढव्यातील फिरोज निजाम शेख अटकेत शासनाने गांभीर्याने घ्यावे पुण्यातील कोंडवा शहरात वास्तव्यास असलेल्या नराधम फिरोज शेख याने २५ मुलींचे केलेली फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि शोषण हे संतापजनक आहे. कोल्हापूर येथील पोलीस पथकाने याची गंभीर दखल घेत हे प्रकरण जनतेसमोर आणल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आजवर ‘लव्ह जिहाद’ मानसिकतेतून प्रत्येक शहरात अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. यात अल्पवयीन बालिकांच्या क्रूर हत्यांचादेखील समावेश आहे. ‘लव्ह जिहाद’ प्रतिबंधक कायदा सरकार लवकरात लवकर करेल, अशी आशा ठेवली होती. पण सरकार या कायद्याला विलंब करत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पहावे अशी प्रतिक्रिया एका दैनिकाला lहिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version