अहमदनगर दिनांक 16 सप्टेंबर
एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये एका नराधम बापावर आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये स्वतःच्या वडिलां विरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या त्या मुली मुळे अत्याचार करणारा नराधम बाप अखेर गजाआड झाला आहे.
14 वर्षे वय असलेल्या आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधाम बाबा विरुद्ध अखेर मुलीनेच आवाज उठवून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नराधम बापाने पुणे वनवडी येथील राहत्या घरी तसेच मामाच्या घरी सोडवायला जात असताना अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार घाट बहीरवाडी शिवारात आपल्याच पोटच्या मुलीवर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीने आपल्या आईस ही हकीगत सांगितल्यानंतर त्या नाराराम बापाने या प्रकरणाची कुठे वाच्यता केली तर दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या प्रकरणी हकीगत अशी की या गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या पुढच्या मुलीवर अत्याचार केला असून पुणे येथील डिफेन्स कॉलनी येथे दि.15/4/2022 रोजी शारीरिक अत्याचार केला तसेच त्यानंतर मुलीला मामाच्या गावी सोडवण्यासाठी पाथर्डी येथे स्कुटीवर सोडण्यासाठी घेवुन जात असताना कोल्हार घाट बहीरवाडी शिवारात असलेल्या जंगलातील डोंगरावर अत्याचाराचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी मुलीने सदर प्रकार आपल्या आईला 12 ऑगस्ट रोजी सांगितला होता मात्र याची वाच्यता कुठे केली तर दोघांनाही जिवे मारून टाकेन अशी धमकी या नाराधम बापाने आपल्या पत्नीला व मुलीला दिली होती.
मात्र अखेर आज या पीडित मुलीने आपल्या बापाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मुलीच्या फिर्यादी नुसार नराधम बापावर भा.द.वि.क 376(2)(F)(I)(J)(K) सह बाल लैंगिक अत्याचार अधि चे कलम 4,5,(N),6,8,12,18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहह्याक पोलीस निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई हंडाळ करत आहेत.