Homeराजकारणकाही लोकांचे मेंदू तपासण्याची गरज.. खासदार सुजय विखे पाटील यांचा पुन्हा विरोधकांना...

काही लोकांचे मेंदू तपासण्याची गरज.. खासदार सुजय विखे पाटील यांचा पुन्हा विरोधकांना टोला अहमदनगर महापालिका आणि पुणे लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौक येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल येथे एम आय आर सेंटरचा शुभारंभ..

advertisement

Lअहमदनगर दि.११ डिसेंबर
अहमदनगर महापालिका आणि पुणे येथील लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल स्टोअर्स यांच्या माध्यमातून प्रोफेसर कॉलनी चौक येथील सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल येथे एम आय आर सेंटरचा शुभारंभ अहमदनगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहमदनगर महानगर पालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, यांच्यासह भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट ,काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि अजी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करत विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे. मी जेव्हापासून खासदार म्हणून निवडून आलो तेव्हापासून दिलेले सर्व आश्वासने पूर्ण करत आलेलो आहे आणि आता आमदार संग्राम जगताप आणि माझ्या माध्यमातून नगर शहराला भरघोस निधी आलेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नगरकर म्हणतील नगर बदलले आहे. एवढी विकास सुरू आहेत आणि होणार आहेत. मात्र काही लोकांच्या मेंदूची तपासणी करण्याची गरज असून त्यांची मेंदूची तपासणी मी नक्कीच करेल असा टोलाही त्यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला आहे. तर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना त्यांनी यावेळी विनंती केली की सर्वात स्वस्त असे एम आय आर सेंटर हे अहमदनगर मध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुरू झाले असल्यामुळे नगरसेवकांनी शिफारस चिठ्ठ्या पाठवू नयेत ही विनंती त्यांनी केली माझेही स्वतःचे सेंटर आहे त्या ठिकाणी तुम्ही या तिथे मोफत करून देतो मात्र हे सेंटर चालवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करण्याचे गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच अहमदनगर शहरात आजपर्यंत घेतलेल्या अनेक कार्यक्रमात हा कार्यक्रम उजवा असल्याचा त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला माझ्या पक्षासह सर्वच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली त्यावर बद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि सर्वांनी असंच एकत्रित साथ दिली तर नगरचा विकास होईल असेही त्यांनी करून सांगितले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular