Homeक्राईममहाराष्ट्र शासनाचा शंभर दिवसीय सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत कोतवाली पोलीस स्टेशनने नाशिक विभागात...

महाराष्ट्र शासनाचा शंभर दिवसीय सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत कोतवाली पोलीस स्टेशनने नाशिक विभागात पटकावला द्वितीय क्रमांक …

advertisement

अहिल्यानगर दिनांक १७ मे
अहिल्या नगर येथे आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कृती कार्यक्रम योजनेचा निकाल जाहीर झाला आहे. नाशिक विभागामध्ये पोलीस निरीक्षक संवर्गामध्ये सर्वोत्तम दुसरा नंबर अहिल्या नगरच्या कोतवाली पोलीस ठाणे यांनी पटकावला आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

१०० दिवस सुधारणा कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामांबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सातत्याने मार्गदर्शन करून आढावा घेत पोलीस दलाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांना, पोलीस ठाण्यांना सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्याबाबत सूचना केल्या होत्या.

त्या अनुषंगाने कार्यालयीन सुधारणा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभजीवनमान तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना करणेबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल उपविभाग स्तरावर कोतवाली पोलीस स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर सर्वोत्तम ठरले आहे.

कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी “बोलताना सांगितले की, लोकांना पासपोर्टची सेवा शंभर टक्के वेळेत पुरवणे, चारित्र्य पडताळणी सेवा १००% वेळेत देणे यासह स्वच्छता उपक्रम, जुने मुद्देमाल निर्गती करणे, रेकॉर्ड अद्ययावत करून जुना रेकॉर्ड नष्ट करणे यासह कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन त्यांना प्रशिक्षित करणे हे काम आम्ही या १०० दिवसाच्या आत यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवले.

पोलीस स्टेशन अंतर्गत व परिसरातील वेळोवेळी स्वच्छतेला महत्त्व देऊन पोलीस स्टेशन स्वच्छ व सुंदर राहील याकडे लक्ष दिले. पोलीस स्टेशन हे अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला व अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती हे वेळोवेळी तपास कामानिमित्त आल्यानंतर त्यांचे नेहमी मार्गदर्शन मिळाल्याने आम्हाला कामांमध्ये प्रगती करता आली वरील सर्वांचे मार्गदर्शन व सूचना चे पालन या आणि सहकाऱ्यांच्या सोबतीने कोतवाली पोलीस स्टेशनची सातत्याने प्रगती करीत राहिलो म्हणून आज आम्हाला हा सन्मान मिळत आहे, असेही पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी ” बोलताना सांगितले

याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार ,नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे ,
अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रताप दराडे यांचे अभिनंदन केले तर आज रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे क्राईम मीटिंग मध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे कौतुक केले

यावेळी क्राईम मीटिंगमध्ये जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ अधिकारी व सर्वच पोलीस निरीक्षक अधिकारी अहिल्यानगर यांनी प्रताप दराडे यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

तसेच शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी रात्री उशिरा कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा सत्कार केला यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular