अहिल्यानगर दिनांक 17 मे
किक या हिंदी चित्रपटातील ‘मौत को छूकर टक से वापस’ हा प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला माहीत असेलच, पण खऱ्या आयुष्यात मृत्यूवर मात करून पुन्हा नवीन आयुष्य सुरू करणाऱ्या प्रज्वल गीते याने हा डायलॉग खरा करून दाखवला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास साजरा करण्यासाठी जगदंब युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सावेडी उपनगरातील शिलविहार परिसरात भगवे झेंडे लावत होते. हरहुन्नरी आणि प्रत्येक कामात अग्रेसर असणारा प्रज्वल गीते या कामात अग्रेसर होता. एका ठिकाणी भगवा झेंडा लावत असताना लोखंडी पाईप मध्ये लावलेला झेंडा थेट लाईटच्या तारांना चिकटल्याने मोठा स्फोटा सारखा आवाज झाला आणि प्रज्वल गीते जागेवरच कोसळला प्रज्वल याचे दोन्ही हात आणि पाय जळाल्यासारख्या अवस्थेत झाले होते. आणि काही कळण्या आधीच प्रज्वल याचे हृदय बंद पडले. पण म्हणतात ना “जाको राखे साईया मार सके ना कोई”.. या म्हणी नुसार त्यावेळी देवदूत म्हणून माजी नगरसेवक निखिल वारे आणि जगदंब युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पदाधिकारी हे धावून आले आणि काही मिनिटातच त्यांनी जवळच असलेल्या सुरभी हॉस्पिटलमध्ये प्रज्वल गीते यास उपचारासाठी दाखल केले.
हॉस्पिटलमध्ये जाताच डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून बंद झालेले प्रज्वल गीते याचे हृदय पुन्हा सुरू करण्यात यश मिळवले मात्र हृदय सुरू झाल्यानंतरही डॉक्टरांपुढे मोठे आव्हान होते ते म्हणजे प्रज्वल गीते याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय यावर इलाज कसा करायचा कारण प्रज्वल याच्या दोन्ही हात पूर्णपणे भाजले होते आणि पायाला ही मोठी इजा झाली होती. बरे हे करण्यासाठी मोठा खर्चही येणार होता. प्रज्वल गीते याच्या मागे एक वयोवृद्ध वडील होते त्यामुळे आता हा खर्च कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्याची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याच वेळी शीलाविहार परिसरातील नागरिकांनी जगदंब युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आणि माजी नगरसेवक निखिल वारे यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता सर्वांनी एक मुखाने प्रज्वल याचे प्राण कसे वाचवायचे हे तुम्ही पहा बाकी आम्ही इलाजाचा खर्च उचलू असे आश्वासन देऊन प्रज्वल याच्यावर इलाज करण्यास सांगितले.
दोन महिने अथक परिश्रम घेऊन डॉक्टरांनी प्रज्वल गीते यास पुनर्जीवन दिले असेच म्हणता येईल कारण संवेदनहीन झालेले प्रज्वल याचे दोन्ही हात प्लास्टिक सर्जरी करून पोटामध्ये जवळपास दीड महिने ठेवण्यात आले होते आणि संपूर्ण कातडे आल्यानंतर हे हात पुन्हा एकदा सर्जरी करून बाहेर काढण्यात आले. प्रज्वल याच्यावर जवळपास दहा ते बारा मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या या सर्व शस्त्रक्रियेचा खर्च नगरसेवक निखिल वारे यांनी केला तसेच शीलाविहार सोसायटी सोसायटी परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह जगदंब युवक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रज्वल गीते याच्यासाठी रोज डबे रोज लागणारी औषधे तसेच त्याची अहोरात्र देखभाल करण्यासाठी आपली स्वतःची ड्युटी रुग्णालयात लावून घेतली होती जगदंब युवा प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील व्यक्ती त्या ठिकाणी ऍडमिट असल्यासारखी प्रज्वल याची सेवा केली.
अखेर अडीच महिन्यानंतर प्रज्वल हा स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि स्वतःच्या पायांनी हॉस्पिटल मधून बाहेर पडला. पुनर्जन्म भेटलेल्या प्रज्वल गीते याने माजी नगरसेवक निखिल वारे आणि जगदंब विवेक प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानले. त्याचबरोबर शीलाविहार परिसरातील प नागरिकांचे त्याने मनःपूर्वक आभार मानून या ऋणातून मी कधीच मुक्त होणार नाही अशी भावना व्यक्त केली.
नगरसेवक निखिल वारे तसेच जगदंब युवा प्रतिष्ठान यांच्यासह रुग्णालयात असलेले सुरभी हॉस्पिटलचे सर्व उपचार करणारे डॉक्टर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या सिस्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रज्वल हा आपला भाऊ मुलगा किंवा आप्तेष्ट म्हणून त्याची सेवा केली. जेव्हा प्रज्वल हा संपूर्ण बरा होऊन हॉस्पिटल मधून निघत असताना सर्व स्टाफच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
देव हा देवळात नसतो तर देव हा माणसात असतो याची प्रचिती पुन्हा एकदा या संपूर्ण घटनेमुळे समोर आली असून माजी नगरसेवक निखिल वारे आणि जगदंब युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हे देव माणसासारखे प्रज्वल याच्या जीवनासाठी धावून गेले आणि सर्वांच्या अथाक प्रयत्नानंतर प्रज्वल गीते याला पुन्हा एकदा पुनर्जीवन देण्यास यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या कामाचे कौतुक करून भगवा झेंडा हाती घेणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही असा संदेश त्यांनी यावेळी दिला. धर्मासाठी भगव्या झेंड्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले बलिदान दिले तोच भगवा झेंडा हातात घेऊन प्रज्वल गीते याचा अपघात झाला होता. मात्र डॉक्टरांसह माजी नगरसेवक निखिल वारे हे प्रज्वल गीते याच्या जीवनात देवा सारखेच धावून आले आणि त्याला पूर्णपणे बरे केले. अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहो आणि प्रज्वल गीते यास पुढील काळात निरोगी आयुष्य जगण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.