अहमदनगर दि.३० ऑक्टोबर
ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळावे या मागणी करता आता राज्यभर आंदोलन पेटले असून मराठा समाजाने ठिकठिकाणी मोर्चे आंदोलने आणि उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून बीड जिल्ह्यात आंदोलनाने चांगलाच पेट घेतला आहे
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय जाळण्यात आले असून बीड आता चांगलेच पेटले आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादी भवन फोडल्या नंतर आता शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही जाळण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी पोचले असून आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब आगीचा स्थळी पोहचले आहेत.
हळूहळू महाराष्ट्र पेटू लागला असून सरकारला हे आंदोलन झेपणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्याच्या पहिल्याच दिवशी दिला होता त्याचा प्रत्यय आता दिसून येत असून हे आंदोलन आता चांगलेच पेटले आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल असेच काहीसे चित्र सध्या दिसून येतेय.