अहमदनगर दि.२४ ऑक्टोबर
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपली आहे मात्र सरकारने अद्याप या बाबत काहीच भूमिका घेतली नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
सरकारला जाग आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आपल्या गावात शहरात जिल्ह्यात साखळी उपोषण करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या बरोबरीने अहमदनगर मधील सकल मराठा व क्रांती मोर्चाच्या वतीने तहसील कार्यालया समोर साखळी पद्धतीने आंदोलन पुकारले असून २५ ऑक्टोबर पासून या आंदोलनास सुरुवात होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या लढाई मध्ये आपले योगदान देण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी रोज जास्तीत जास्त संख्येने येण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.