HomeUncategorizedदहशत रूपी रावणाचे दहन करायचे असेल तर नगरकरांना गांधीजींच्या तीन मकडां...

दहशत रूपी रावणाचे दहन करायचे असेल तर नगरकरांना गांधीजींच्या तीन मकडां प्रमाणे मुके,बहिरे, आंधळापणा सोडून द्यावा लागेल तरच गुंडगिरी दहशत संपेल

advertisement

अहमदनगर दि.२४ ऑक्टोबर
अहमदनगर मध्ये गुंडगिरी वाढली असे प्रत्येक जण म्हणतो मग गुंडगिरी कोणी वाढवली आणि ती गुंडगिरी कोण पोसतोय तर याचे उत्तर गुंडगिरी सर्व नगरकर पोसतोय ही खरी हकीकत आहे.

नगर शहरात खून, मारामारी, छेडछाड, ताबेमारी, गुटखा तस्करी ,मावा तस्करी, याला कोण जवाबदार तर ते पोलिसांपेक्षा नगरकर जास्त जबाबदार आहेत कारण या सर्व गोष्टी प्रत्येक नगरकरांच्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात मात्र नगरकर गांधीजींच्या तीन माकडांसारखे मुके, बहिरे आणि आंधळे असल्यासारखे या सर्व गोष्टींकडे निमूटपने पाहतो आणि सहन करतो आणि त्यामुळेच नगरमध्ये गुंडागर्दी वाढत आहे.

राजकीय पक्ष नेता कोणीही असो त्याला ही छोटी मोठी गुंड आपल्या आसपास लागतातच कारण वेळप्रसंगी या गुंडांकर्वी आपले हवे ते काम साध्य करून घेण्यासाठी या गुंडांचा वेळेनुसार उपाय होतो केसेस या गुंडांवर होतात मात्र फायदा राजकीय नेत्यांचा होत असतो. नगर शहरात प्रत्येक राजकीय नेता म्हणतो गुंडागर्दी वाढली जातेय,जातीवाद वाढतोय दोन समाजात निर्माण होईल यासाठी विविध वक्तव्य आणि इतिहासातील घटनांची मोडतोड करत त्याचा वापर दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी केला जातो मात्र दरवेळेस खापर हे पोलिसांवर फोडले जाते प्रत्येक नेता पोलिसांवर तोंडसुख घेतो मात्र तोंड सुख घेण्याआधी हा नेता कधीही विचार करत नाही की यामागे कुठेतरी आपलेच कार्यकर्तेही कधी ना कधी सामील असतात.

राज्यात सध्या त्यांची सत्ता आहे ते म्हणतात शहरात कायदा सुव्यवस्था बिघडली मग गृहमंत्री तुमचाच मुख्यमंत्री तुमचाच मग कायदा सुव्यवस्था सुरळीत करायचे असेल तर वरिष्ठांना सांगून ती सुरळीतही होऊ शकते विरोधी पक्षनेते येतात आणि सांगतात शहरात गुंडागर्दी वाढली मग इतके वर्ष तुम्ही काय केले हे थोडे नगरकरांना समजून तर सांगा मोठमोठ्या चारचाकी गाड्या मध्ये पोलिसांच्या फौजफाटा घेऊन नगर शहरात गुंडागरी वाढली म्हणायला काही वाटत नाही.

सामान्य नगरकर नेहमीच सर्व गोष्टी सहन करतो मात्र राजकीय नेते बाहेर जिल्ह्यातून बाहेर शहरातून येतात आणि नगर शहरात गुंडगिरी वाढतात हे सांगत असताना मग तुमच्या पक्षाच्या वतीने तुमच्या कार्यकर्त्यांना सांगून शहरातील कायदा सुव्यवस्था नीट करा ना असेच तर म्हणावे लागेल.

शहरीकरण वाढत चालले आहे तसा परिसर वाढला आहे.शहर आणि उपनगरात अनेक तरुण मंडळ तयार झालीत या तरुण मंडळांकडून अनेक कार्यक्रमात आता मिरवणुका काढण्याची जणू स्पर्धा सुरू झालीय आणि या मिरवणुकीत डीजे वाजवण्याचा प्रकार तर दिवसेंदिवस वाढत चालला आहे या डीजे मुळे अनेक लोकांचे प्राण गेले कोणी बहिरे झालेत अनेक वयोवृध्द lokama मात्र डीजे बंदी वर नगरकर गप्प
सर्वजण म्हणतात शहरात गुंडागर्दी वाढलीय मग ती कशामुळे कमी होणार यासाठी कोणीतरी प्रयत्न करणार नाही का की पोलीस टारगेट करून राजकीय पोळी भाजून घेऊन नुसते राजकारण करत राहायचे हा काहींचा धंदा झालाय.

गुंडगिरी दहशत संपवण्या नगरकरांनी आता रस्त्यावर उतरायला पाहिजे रोखठोक भूमिका घेतली पाहिजे तरच ही गुंडागर्दी कायमची संपू शकते आपल्यासमोर जे घडते ती गोष्ट आपल्याला थांबवता येत नसेल तर किमान चार लोकांच्या कानावर ही गोष्ट सांगून ती कुठेतरी थांबवता आली किंवा पोलीस प्रशासन आहे महसूल प्रशासन आहे थेट मुख्यमंत्री आहेत या सर्वांचे फोन नंबर सध्या सर्व खुले आहेत सोशल मीडिया सर्वात स्ट्रॉंग मीडिया म्हणून सध्या देशात नव्हते जगात झालेला आहे त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करून या गोष्टींना आपण निश्चित वाचा फोडू शकतो.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular