अहमदनगर दि.२५ ऑक्टोबर
मराठा आरक्षण विषय गंभीर वळणावर पोहचला असून मराठा आरक्षण विषयावर राज्य सरकार व केंद्र सरकार गंभीर नसून, २६ रोजी शिर्डी येथील जाहीर सभेत प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी मराठा आरक्षणावर भूमिका मांडली नाही तर शेकडो मराठा तरुणांना घेऊन सरळ जाहीर सभेत घुसून जाब विचारणार असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली आहे.
मराठा आरक्षण विषय गंभीर वळणावर पोहचला आहे, निराशेच्या भवनेमधून मराठा आत्महत्या करत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचे ठाम तयार झाले आहे. राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणे ही राज्य व
सरकारची जबाबदारी असून देखील दोन्ही सरकारे गोलगोल बोलून वेळ मारून नेत आहेत. आता जबादारी सरकार आणि केंद्र सरकारची आहे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ रोजी शिर्डी येथे जाहीर सभा घेत आहेत तर त्यांनी मराठा आरक्षण विषयावर जाहीर भूमीका मांडून मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण देण्याची हमी देउन मराठा समाजाला अश्वस्थ केले पाहिजे ही मागणी आहे आणि त्या दृष्टीने राज्यातील भाजपा नेत्यांनी तशी आग्रही भूमिका पंतप्रधनपद नरेंद्र मोदींकडे मांडून उद्या सभेतून मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे. जर पंतप्रधान नरेंद्र
मोदींनी या गंभीर विषयावर आपली भूमीका मांडली नाही तर मात्र शेकडो मराठा तरुणांना घेऊन सरळ जाहीर सभेत घुसून जाब विचारला जाईल असा इशारा पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिला आहे.