Homeक्राईमगाडीला कट मारल्याचा राग..किरकोळ वादातून निघाल्या तलवारी सोमठाणे नलवडे बुद्रुक येथील काकडे...

गाडीला कट मारल्याचा राग..किरकोळ वादातून निघाल्या तलवारी सोमठाणे नलवडे बुद्रुक येथील काकडे कुटुंबीयांवर हल्ला…गुंडांनी महिलांनाही केली अमानुष मारहाण…

advertisement

अहिल्यानगर दिनांक ३ जुलै

गाडीला कट मारल्याचा राग येऊन पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे नलवडे बुद्रुक या गावात वीस वर्षीय शनिल रामदास काकडे या तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना तलवार लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना २ जुलै रोजी घडली असून याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात संतोष माणिक खवले, राहुल विनायक खवले, माणिक खवले (पुर्ण नाव माहित नाही) अमोल खवले (पुर्ण नाव माहित नाही) चिमाजी धनवडे (पूर्ण नाव गांव माहित नाही) व इतर अनोळखी 6 ते 7 जण यांच्याविरुध्द विविध गंभीर कलमाअन्वये पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oplus_0

या प्रकरणाची हकीगत अशी की शनिल रामदास काकडे आणि त्याचा मित्र करण संजय कासुळे दोघे शेतातून दुचाकीवरुन घरी येत असताना गावातील जिल्हा परिषद शाळे समोर आले असताना संतोष माणिक खवले याने त्यांना अडवून माझ्या गाडीला कट का मारला असे विचारले. यावेळी फिर्यादीने सांगितले की आम्ही कट मारलेला नाही त्यावेळी संतोष खवले याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी करण कासुळे यांनी दोघांचे भांडण सोडवले आणि ते घरी गेले त्यानंतर काही वेळाने संतोष माणिक खवले, राहुल विनायक खवले, माणिक खवले, अमोल खवले, चिमाजी धनवडे आणि इतर अनोळखी 6 ते 7 जणांनी काकडे यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली या मारहाणीत काकडे यांच्या कुटुंबातील अनेक महिला जखमी झाले आहेत कारण मारहाण करणाऱ्यांच्या हातात तलवारी लोखंडी रोड आणि लाकडी दांडके होते. या मारहाणीत महादेव झिरपे यांच्या डोक्याला तलवार मारली वयोवृद्ध असलेल्या पार्वती शंकर काकडे यांना सुद्धा मारहाण करण्यात आली तर या मानाने संगीता शंकर काकडे, सदाशिव ऊर्कीडे, नंदाबाई सदाशिव काकाडे, तनेश रामदास काकडे, योगेश शंकर काकडे, दिपाली योगेश काकडे, रामा काकडे यांना मारहाण करण्यात आली. तसेच जाताना लोखंडी रॉड व काठ्यां मारुन गाड्यांचे नुकसान करण्यात आले. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्यांना पाथडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून. पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पाथर्डी पोलीस भरारी आरोपींचा तपास करत आहेत मात्र वरील आरोपींची गावात मोठी दहशत असून अनेक वेळा त्यांनी गावातील इतर लोकांनाही त्रास दिला असल्याची माहिती समोर येत आहेत त्यामुळे या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता संपूर्ण गावातून होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular