अहमदनगर दि.२६ नोव्हेंबर
मर्चंट्स बँकेच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 10 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी बँकेच्या अधिकाऱयांसह संचालकांना मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश पोलिसांनी बजाविला आहेत.
तत्कालीन अध्यक्ष हस्तिमल चांदमल मुनोत, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश हिरालाल कटारिया, तत्कालीन शाखाधिकारी मदन पन्नालाल मुनोत, तत्कालीन जॉइंट सीईओ अनुलिंग जगन्नाथ वसेकर, सीए आनंदराम चंदनमल मुनोत, अजय अमृतलाल मुथा, मोहनलाल संपतलाल बरमेचा, कमलेश पोपटलाल भंडारी, संचालक संजय चोपडा, संजयकुमार कुलदीप, अमित विजयकुमार मुथा, संजीव झुंबरलाल गांधी, मीना वसंतलाल मुनोत, प्रमिलाबाई हेमराज बोरा, विजय भागवतराव कोथिंबिरे, सुभाष मारुती भांड, संदीप नारायणदास लोढा यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
नगर मर्चंट्स बँकेतील 10 कोटींच्या फसवणूक प्रकरणात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन तत्काळ तपास करण्याची मागणी केली होती. यापूर्वी एमआयडीसी पोलिसांनी तीन अधिकाऱयांची चौकशी केली आहे. यामध्ये बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांचाही समावेश होता.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला पत्र देऊन बँकेच्या ऑडिटसंदर्भातील माहिती मागविली होती. तीही अद्यापि प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या घटनेचा तपास लवकरात लवकर व्हावा यासाठी एमआयडीसी पोलिसांनी बँकेच्या अधिकाऱयांसह 17 जणांना मंगळवारी चौकशीसाठी बोलाविले आहे.