अहमदनगर दि.६ एप्रिल
अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित अशी संपदा पतसंस्था घोटाळा प्रकरणी आज न्यायालयाने सर्व संचालक मंडळांना पोलिसांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयात हजर असलेल्या जवळपास 17 संचालकांना न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यात संपदा पतसंस्थेच्या 13 शाखा होत्या.आणि जवळपास पतसंस्थेत 25 कोटी 93 लाख 78 हजार 189 रुपयांच्या ठेवी होत्या तर 26 कोटी 96 लाख 48 हजार 395 रुपयांचे कर्ज येणे बाकी होते . 31 मार्च 2010 रोजी झालेल्या लेखापरिक्षणानंतर सुमारे 13 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते.
लेखापरिक्षक देवराम बारस्कर यांनी संस्थाचालकांवर गुन्हा दाखल केला होता. पतसंस्थेचा अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याला अटक झाल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या होत्या.सुमारे 2 कोटींचे सोने बोगस असल्याचं त्यावेळी समोर आले होते त्यामुळे ठेवीदार चांगलेच हादरून गेले होते तेव्हापासून न्यायालयात हा खटला सुरू होता अनेक संचालक अटक होऊन आता जमिनीवर बाहेर आले होते.
हे प्रकरण न्यायालयात असून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून आज दुपारी न्यायालयात हजर असलेल्या जवळपास 17 संचालकांना न्यायालयाने ताब्यात घेण्याच्या आदेश पोलिसांना दिले होते त्यानुसार पोलिसांनी संगिता हरिचंद्र लोंढे, सुजाता झानदेव वाफारे, संजय चंपालाल बोरा, साहेबराव रामचंद्र भालेकर,अनुप प्रविण पारकर,गोपीनाथ शंकर सूंबे,महेश बबनराव झावरे,सुधाकर गोपीमाय सुंबे,बबन देवराम झावर,रविद्र विश्वनाथ शिंदे, ज्ञानदेव संभाजी वारवार,हसन अमीन राजे,सुधाकर परशुराम थोरात, भाऊसाहेब कुशाबा झावरे,हरिचंद्र सावळीराम लोंढे, दिनकर बाबाजी ठूबे, लहु सयाजी दांगाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामुळे पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आता न्यायालय यांच्यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.