HomeUncategorizedमनविसे अध्यक्ष अमित ठाकरे ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणार...

मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणार – सुमित वर्मा

advertisement

अहमदनगर दि.२४ ने

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष मा.श्री.अमित राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर जिल्ह्या मनविसे तर्फे विद्यार्थ्यांनाच अनोखी भेट देण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांच्या हाताला हात देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व अहमदनगर  महराष्ट्रा नवनिर्माण विध्यर्थी सेना   स्विकारणार असल्याचं जिल्हा अध्यक्ष सुमित वर्मा यांनी सांगितलंय

या मध्ये त्यांना जी काही शैक्षणिक मदत लागेल ती केली जाईल.या पुर्वी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शेकडो मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना घडवण्याचे काम केले आहे यातील काही मुलांनी उच्च शिक्षण घेऊन देश पातळीवर यश संपादन केले आहे . शिक्षण असेल तर भविष्यात कोणत्याही गोष्टीला गवसणी घालण्याची उर्जा तयार होते आणि हिच उर्जा देण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने  करत असल्याचं वर्मा याांनी सांगितले.

शहरात सह जिल्ह्यातील अभ्यासू आणि गरजू विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा या साठी तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड – ७५१९१०१९१९ , उप तालुकाध्यक्ष संकेत जरे – ८२०८९६९०२८ , उप शहराध्यक्ष स्वप्निल वाघ – ७०२०११९३४८ , विभाग अध्यक्ष अनिकेत शियाळ – ८८८८२३२४४५ या क्रमांकावर संपर्क साधुन आपली संपूर्ण माहिती व्हॉट्स ॲप पर पाठवावी आणि आपली नोंदणी करून घ्यावी. असे आवाहनही मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केल आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular