अहमदनगर दि. ६ ऑगस्ट
अहमदनगर शहरातील मुकुंद नगर भागातील एका तरुणाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खालच्या पातळीवर जाऊन अत्यंत अपमानास्पद विधान करत व्हिडिओ काढून तो स्टेटस वर ठेवला होता मात्र पोलिसांनी तातडीने पावले उचलत या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. मात्र या घटनेच्या निषेधार्थ रविवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नीच प्रवृत्ती विरुद्ध निषेध मोर्चा काढून पुतळा दहन करण्यात आले.
त्यानंतर आता सोशल मीडियावर सोमवारी अहमदनगर जिल्हा बंदचे आवाहन करणारे पोस्टर फिरू लागले आहेत. मात्र हे आवाहन नेमकं कोणी केले याबाबत अध्यापही खात्रीशीर माहिती नाही. त्यामुळे फक्त सोशल मीडियावर बंदचे आवाहन करणारे पोस्टर व्हायरल होत आहेत. पोलिसांनाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नसल्याने नगरकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे सोशल मीडियावर होणारा व्हायरल मेसेज असा आहे.
अहमदनगर संपूर्ण जिल्हा बंद बंद बंद…
छत्रपती शिवाजी महाराजांना शिवीगाळ करून
ओरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्यांचा जाहीर निषेध..
महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना अहमदनगर मधील तरुणाने शिवीगाळ करून देवी देवता वरती अपशब्द वापरून संपूर्ण महाराष्ट्र व छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी बदनामी करूनही आरोपी मोकाट… याचा निषेध म्हणून सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी अहमदनगर बंद बंद
याची सर्व व्यापारी व्यावसायिक ग्रामस्थ यांनी नोंद घ्यावी