Homeविशेषराजकीय बुरखा घालून ताबेमारीचा प्रयत्न मात्र चणाक्ष लोकांमुळे प्रयत्न फसला...

राजकीय बुरखा घालून ताबेमारीचा प्रयत्न मात्र चणाक्ष लोकांमुळे प्रयत्न फसला…

advertisement

अहमदनगर दि ६ ऑगस्ट
अहमदनगर शहरामध्ये ताबे मारण्याचे प्रकार त्यामधून होणारी गुन्हेगारी आणि या गुन्हेगारातून उदयास येणारे नवनवीन टोळ्या आणि त्यातून होणारे खून हे आता नगरकरांना नवीन नाही. मात्र याच्या शेवटपर्यंत गेल्यास याला राजकीय वरदहस्त असतोच त्यामुळेच या ताबा मारणाऱ्या टोळ्या नगर शहरात धुमाकूळ घालत आहेत.

राजकीय बुरखा पांघरून काळे कृत्य करणारे अनेकजण नगर शहरात असून नगरमध्ये अजून एक ताबा मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र तणाक्ष नागरिकांमुळे हाणूनही पडला होता. नगर शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने एक लेटिकेशन असणारी जागा विकत घेतली होती. विशेष म्हणजे हा बांधकाम व्यवसायीक अशा लिटिकेशनच्या जागा पाहूनच विकत घेत असल्या साठी प्रसिद्ध आहे. नगर पुणे औरंगाबाद रोडवरील एका महाविद्यालयाच्या शेजारी असणारी मोक्याची जागा त्या बांधकाम व्यवसायिकाने घेतली आणि त्या बांधकाम व्यावसायिकाने त्या ठिकाणी असलेले काही दुकानदार गाडी दुरुस्त करणारे मेकॅनिक यांना खाली करण्यासाठी एका नेत्याला सुपारी दिली. नेत्याने सुपारी घेऊन जागेची पाहणी केली आणि त्याने एक शक्कल लढवली त्या ठिकाणचे अतिक्रमणधारक आणि जे लोक मूळ मालक आहेत मात्र न्यायालयात जागे बाबत भांडण चालू आहे अशा लोकांना जाऊन भेटला आणि या जागेवर राजकीय पक्षाची शाखा उघडणार असल्याचे सांगून जागा मोकळी करण्याचे फर्मान दिले. तसेच त्याकाळी सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या नावानेही भीती दाखवून ही जागा त्या खाली जाईल असेही सांगायला तो विसरला नाही तसेच आपल्या पदाचा फायदा घेऊन यात काही प्रशासकीय लोकांना बोलून घेऊन ही जागा उड्डाणपुलामध्ये कशी जाईल हे त्या जागेवरील लोकांना सांगण्याचा प्रयत्नही त्या राजकीय नेत्याने केला.

जागा एकाची त्याला मालक दुसरा विकत घेतली तिसऱ्याने आणि या जागेवर ताबा मारण्यासाठी आला चौथा अशी व्यथा या जागेची झाली होती. मात्र या जागेवरील लोकांनी त्या राजकीय नेत्याला भावच न दिल्याने अखेर त्या ठिकाणी काही गुंड ही पाठवण्यात आले होते. मात्र हे प्रकरण पोलिसात जाताच अखेर या ताबा मारीवर पडदा पडला. मात्र जागा खाली करण्यासाठी घेतली सुपारी त्या राजकीय बुरखा घातलेल्या पुढाऱ्याच्या खिशातच गेली ती सुपारी परत मिळण्यासाठी त्या बांधकाम व्यवसायिकाने प्रयत्न केला मात्र सुपारी अखेरपर्यंत राजकीय पुढार्‍याच्या खिशातून बाहेर निघालीच नाही.मात्र एकीकडे ताब्याबद्दल तोंड सुख घेताना आपणही त्या ताब्याचे कुठेतरी भागीदार आहोत हे या लोकांना कळायला पाहिजे. नगरमध्ये व्हाईट कॉलर ताबेमारी सध्या जोरात सुरू असून यामुळेच पोलीसही अशा लोकांवर कारवाई करताना कुठेतरी मागे पडतात मात्र या ताबेमारी विरोधात सर्वसामान्य लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे अन्यथा म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावेल म्हणून ताबे मारीच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे..

(लवकरच केडगाव मध्ये पुन्हा दहशत.. कोण करतय ताबे मारी..)

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular