Homeशहरनगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणात फक्त कर्मचारी दोषी कसे ? कर्ज...

नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरणात फक्त कर्मचारी दोषी कसे ? कर्ज मंजूर करणारी उपसमिती, छाननी समिती आणि संचालक मंडळाबाबत पोलिस ठोस भूमिका कधी घेणार..

advertisement

अहमदनगर दि.१८ जानेवारी
नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणातील इतर
आरोपींवर काय कारवाई केली असा सवाल खुद्द जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. सत्रे यांनी केला होता.

नगर अर्बन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र शांतीलाल लुणिया (वय ५६, रा. राऊतमळा, कल्याण रोड) व प्रदीप जगन्नाथ पाटील (५५, रेणावीकरनगर, सावेडी) अशा दोघा आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.इतर आरोपींना नोटिसा बजावलेल्या आहेत. काही आरोपी हजर झाले असून, काहीजण हजर झालेले नाहीत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले होते.

अर्बन बँकेच्य गैरव्यवहार प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आर्थिक गुन्हे शाखेला प्राप्त झालेला आहे. त्यात नगर अर्बन बँकेतील काही कर्मचाऱ्यांचा आणि संचालकांचा समावेश असल्याचं समोर आले आहे. मात्र तरीही पोलीस कर्मचाऱ्यांना व्यतिरिक्त जे जबाबदार संचालक आहेत त्यांच्याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याने ठेविदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ज्या संचालकांचा दोषी मध्ये समावेश आहे त्यांना अटक करून त्यांच्याकडून पैसे वसूल करावेत अशी मागणी ठेवीदारांनी वेळोवेळी केली आहे.मात्र काही संचालक अजूनही व्हाईट कॉलर म्हणून मिरवत असून विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम मध्ये व्यासपीठावर दिसून येत असल्यामुळे चोरी करून पुन्हा शिरजोरी असाच काहीसा प्रकार सध्या सुरू आहे. आरोपी पोलिसांना सापडत नाही मात्र अनेक ठिकाणी आरोपीच पोलिसांचा समोर असतानाही कारवाई करत नाही असे काही पुरावे आता ठेवीदारांच्या हाती लागले असून ते पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचे समजतेय.

अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणात काही ठराविक कर्मचाऱ्यांचा या घोटाळ्यात हात असेलही मात्र हा घोटाळा करताना कर्ज मंजूर करणारी उपसमिती, छाननी समिती आणि संचालक मंडळाबाबत पोलिस ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत हे विशेष.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular