Homeक्राईमनगर पुणे रोडवरील लोखंडी सळई तस्कर कमळकरच्या मुसक्या पोलिस अवळनार का ?...

नगर पुणे रोडवरील लोखंडी सळई तस्कर कमळकरच्या मुसक्या पोलिस अवळनार का ? सरकारला लाखो रुपयांचा चुना लावत सुरू आहे अवैद्य लोखंडी सळई विक्री.. विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब आता तुम्हीच लक्ष घाला… तरच हा अवैध व्यवसाय बंद होऊ शकतो..

advertisement

नगर दि.१८ जानेवारी

पुणे नगर रोडवरील टोल नाक्या शेजारी असलेल्या
कमळकर नामक सळई तस्कराने अवैद्य दुकाने थाटून सळई तस्करी जोरात सुरू आहे. मात्र या लोखंडी सळई तस्करी कडे पोलीस आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येतेय.

स्टील माफिया कमळकर प्रशासनाला लाखो रुपयांचा चुना लावून अवैद्य तस्करीचे डॉन झाला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. कारण स्थानिक पोलीस या सळई तस्करांच्या बाबत कोणतीच भूमिका घेत नसल्याने आता विशेष पोलीस महानिरीक्षकांनी यामध्ये लक्ष घालून हे अवैध धंदे बंद करण्याची गरज आहे. याची तस्करीची साखळी फार मोठी असून जालना ते मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही साखळी कार्यरत आहे.

जालना येथून मुंबई, पुणे आणि राज्यातील इतर भागात जाणाऱ्या लोखंडी सळीई वाहनांकडून सळई छुप्या मार्गाने विकत घेऊन त्या बाजारभावापेक्षा कमी दराने विकण्याचा धंदा मोठ्या जोरात सुरू असून भर महामार्गावर हॉटेलच्या आड हे अवैध धंदे सुरू आहेत.

पुणे नगर रोडवरील सुपे टोल नाक्या पुढे असलेल्या एका हॉटेल जवळच कमळकर नामक व्यक्तीचे मुख्य महामार्गावर खुलेआम अवैद्य धंदे सुरू ठेवून पोलीस आणि महसूल प्रशासनाला एक प्रकारे आव्हान दिले आहे.

बर हा प्रकार सुरू असताना पोलिसांना याची माहिती नसणे असे होणारच नाही त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक बघ्याची भूमिका का घेत आहे असाही प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

नगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अथवा सूपा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक नेमक काय करतेय यावरही आता प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. स्थानिक गुन्हे शाखा अनेक अवैध धंद्यांवर छापे टाकून कारवाई करत असतात संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना असतो मग सर्वच या सळई तस्करी कडे डोळेझाक का करतात असा प्रश्नही उपस्थित होतोय.

पुणे नगर महामार्गावर सुपे टोल परिसरात कमळकरचे वर्चस्व असून अवैद्य सळई तस्करीचा धंदा जोमात सुरू ठेवला आहे.यामध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पद्धतशीर कार्यक्रमही केला जातो. तसेच धंद्याला कोणी आडवे आले तर त्याला आडवे करण्याचे खास हातखंडे कमळकर कडे असल्यामुळे पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात का ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

जालना येथे लोखंडी सळीई उत्पादनाच्या विविध कंपन्या असून या कंपन्यांचा माल राज्यभर वितरित केला जातो राज्य शासन आणि केंद्र शासनाचे मोठमोठे प्रकल्प यांनाही कंपन्यांकडून माल पुरवला जातो त्यासाठी मोठ मोठ्या ट्रक मधून राज्यभर मला वितरित केल्या जात असताना मापात पाप करून ठरविक ठिकाणी हॉटेल वर थांबून या चारचाकी ट्रक मधून चोरून लोखंडी लोखंडी सळया काढल्या जातात आणि तो माल बाजार भावापेक्षा कमी किमतीत ग्राहकांना विकला जातो यामध्ये महिन्याला करोडो रुपयांची उलाढाल होत असून यामध्ये ट्रक चालक आणि लोखंडी सळई विकत घेणारे तस्कर यांचे लागेबंध असल्यामुळे हा प्रकार मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे.

हे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे कमळकरच्या हॉटेल वर आणि शेड वर पोलिसांनी जाऊन तपासणी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात मात्र यासाठी आता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.तसेच राज्याच्या महसूल खात्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण करोडो रुपयांचा महसूल अवैद्य मार्गाने सरकारकडे न जाता दुसऱ्याच्या खिशात जात असल्यामुळे पोलिस आणि महसूल खात्याने संयुक्त कारवाई करून कमळकरच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular