Homeक्राईमजिल्हा परिषद मधील तोडफोड प्रकरणी प्रकाश पोटे यांना अटक...सरकारी तसेच कुठल्याही खाजगी...

जिल्हा परिषद मधील तोडफोड प्रकरणी प्रकाश पोटे यांना अटक…सरकारी तसेच कुठल्याही खाजगी कार्यालयाची तोडफोड केल्यास कोणाची गय केली जाणार नाही- पोलीस निरीक्षक प्रताप दराडे

advertisement

अहमदनगर दिनांक १८ जानेवारी

जिल्हा परिषद मध्ये राडा घातल्या प्रकरणी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष प्रकाश पोटे यांना कोतवाली पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात भदवी कलम 353 427, 504, 506 नुसार सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियमन कलम 3, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुरुवारी दुपारी जिल्हा परिषद अहमदनगर येथे ग्रामिण पाणीपुरवठा ऑफिसचे कार्यालयीन कामकाज सुरु असतांना प्रकाश पोटे यांनी मौजे कोल्हेवाडी येथील जल जिवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद पाणिपुरवठा विभागाने केलेले काम हे निष्कृष्ठ आहे या कारणावरुन जिल्हा परिषद येथे ग्रामिण पाणीपुरवठा ऑफिसमध्ये तोड फोड केली होती.

या प्रकरणातील आरोप असलेला प्रकाश पोटे याचा शोध घेऊन त्यास काही तासातच ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व उपविभाग पोलीस अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पथकातील पोहेकॉ/ योगेश भिंगारदिवे, सोमनाथ राऊत, संदिप थोरात यांनी केली.

कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी असे आव्हान केले आहे की, सरकारी तसेच कुठल्याही खाजगी कार्यालयाची तोडफोड केल्यास कोणाची गय केली जाणार नाही.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular