Homeशहरशहराच्या स्वच्छतादूतांनसोबत नगरसेवक योगीराज गाडे यांचा वाढदिवस साजरा... स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून...

शहराच्या स्वच्छतादूतांनसोबत नगरसेवक योगीराज गाडे यांचा वाढदिवस साजरा… स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छता राखणारे आपल्या शहराची शान – योगीराज गाडे

advertisement

अहमदनगर दि.23 डिसेंबर

अहमदनगर शहरातील युवा उद्योजक आणि प्रभाग क्रमांक ४चे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी आपला वाढदिवस अहमदनगर महानगरपालिकेच्या सफाई कामगारांबरोबर साजरा करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

वाढदिवस साजरा करणे म्हणजे जीवनातील एक वर्ष कमी होत असताना पुढील वर्षांमध्ये प्रवेश करताना सार्वजनिक काम करत असताना समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून नगरसेवक योगीराज गाडे यांनी आपला वाढदिवस महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांबरोबर साजरा केला आहे. सफाई कर्मचारी म्हणजे रोज पहाटे उठून अहमदनगर शहर स्वच्छ करण्याचे काम करणारा माणूस आज ते आहेत म्हणून आपण स्वच्छता पाहू शकतो.या कर्मचाऱ्यांमुळे आपलं शहर स्वच्छ व सुंदर आहे. या स्वच्छता दूतांचे आयुष्य रोजच शहरातील स्वच्छता करण्यात जात असतं मात्र त्यांच्या या जीवनात एक दिवस कुठेतरी चांगला दिवस साजरा करण्याची संधी यावी म्हणून नगरसेवक योगीराज गाडे यांनी आपला वाढदिवस त्यांच्या बरोबर साजरा करत त्यांच्यासोबत स्नेहभोजन केले तसेच त्यांचा यथोचित सत्कारही यावेळी योगीराज गाडे यांनी केला.

आज आपला परिसर जो काही स्वच्छ आहे त्याचे श्रेय या स्वच्छता कामगारांनाच जातं. रस्त्यांवर झाडू मारणे, चेंबर साफ ठेवणं, प्रत्येक घरांचा कचरा गोळा करून कचराडेपो पर्यंत पोहचवणे ही सर्व कामे ही कर्मचारी स्वतःच आरोग्य धोक्यात टाकून करतात. हेच आपले खरे स्वछता दूत आहेत.सफाई कर्मचारी आपल्या शहराचे शान आणि अभिमान आहे. ते आहेत म्हणून स्वछता आहे. आणि त्यामुळे त्यांचा सन्मान होणे हे गरजेचे आहे आणि त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करून एक वेगळाच आनंद आपल्याला होत असल्याचे यावेळी बोलताना योगीराज गाडे यांनी सांगितले.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular