Homeशहरमहापालिकेच्या क्रीडांगणावर महासलुचा ताबा..जप्त केलेली वाहने मनपाच्या क्रीडांगणावर लावल्याने खेळाडूंनी खेळावे कुठे...

महापालिकेच्या क्रीडांगणावर महासलुचा ताबा..जप्त केलेली वाहने मनपाच्या क्रीडांगणावर लावल्याने खेळाडूंनी खेळावे कुठे ?

advertisement

अहमदनगर दि.१८ ऑक्टोबर

अहमदनगर महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले गंगा उद्यान मागील क्रीडांगणावर महसूल विभागाने जप्त केलेल्या गाड्या लावल्यामुळे या ठिकाणी खेळत असलेल्या खेळाडूंना आपला खेळ बंद करावा लागला आहे.

तहसील कार्यालया मागील जागेवर महसूल भवन बांधण्याचा मोठा कार्यक्रम झाला. लवकरच या ठिकाणी आता मोठे महसूल भवन उभारण्यात येणार आहे. मात्र या जागेवर काही वर्षांपासून महसूल विभागाने कारवाई केलेल्या वाळू डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक अशा अनेक गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. महसूल भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त या सर्व गाड्या गंगा उद्यान मागील मोकळ्या मैदानावर लावण्यात आल्या होत्या मात्र या गाड्या दोन दिवसात काढून घेतल्या जातील असे वाटत असतानाच या ठिकाणी आता महसूल विभागाने या ठिकाणी बंदोबस्तस असलेल्या पोलिसांसाठी शेड टाकली तसेच लाईट मीटर घेण्यात आले आहे त्यामुळे आता महसूल विभाग या ठिकाणावरून आपला डेरा हलवणार असल्याचे चिन्ह दिसत असल्यामुळे या ठिकाणी खेळत असलेल्या खेळाडूंना आपला खेळ थांबवावा लागला आहे. कारण खेळाच्या मैदानावरच मोठ मोठ्या ट्रक, डंपर, जेसीबी लावण्यात आल्यामुळे खेळाडूंना या खेळता येत नाही. काही सामने या ठिकाणी भरवण्यात आले होते मात्र या जप्त केलेल्या गाड्या या ठिकाणी लावण्यात आल्यामुळे अखेर दुसऱ्या ठिकाणी मैदान उपलब्ध करून त्या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.त्यामुळे महसूल विभागाने एका प्रकारे महानगरपालिकेच्या क्रीडांगणावर ताबा मारला का काय असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

जॉगिंग ट्रॅक अनेक लहान मुले तरुण मुले खेळत असतात ही जागा आता अपुरी पडू लागल्याने गंगा उद्यान मागील मैदान मोठी असल्याने या ठिकाणी सकाळपासूनच अनेक खेळाडू विविध खेळ खेळत असतात या मैदानावर क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी अशा खेळांची प्रॅक्टिस चालू असते मात्र जुन्या आणि भंगार गाड्या लावल्यामुळे या ठिकाणी साप,विंचू यांची भीती निर्माण झाली असून पालक आपल्या मुलांना या ठिकाणी पाठवण्यास तयार नाहीत त्यामुळे या गाड्या लवकरात लवकर काढाव्यात अशी मागणी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular