Homeजिल्हाहोय मी येतोय तुम्ही पण या... देशात सुरू असलेल्या हुकूमशाहीच्या विरोधात... या...

होय मी येतोय तुम्ही पण या… देशात सुरू असलेल्या हुकूमशाहीच्या विरोधात… या आधुनिक स्वतंत्रतेच्या लढाईत तुम्हालाही सामील व्हायचंय.. निर्भय बनो निखिल वागळे यांची वीस फेब्रुवारीला अहमदनगर मध्ये सभा…

advertisement

अहमदनगर दिनांक 19 फेब्रुवारी
देशात आणि राज्यात हुकुमशाही पध्दतीने काम सुरु आहे. निवडणूक आयोग, ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय या स्वायत्त संस्थांचा गैरवापर सुरु आहे. तरुणाईतील बेरोजगारी, महागाई, धार्मिक, जातीय तेढ यामुळे सर्व स्तरातील जनता त्रस्त आहे. विकास हरवलेला आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर साधे चांगल्या दर्जाचे रस्ते सुध्दा कर भरून देखील मिळत नाहीत. विविध बाबींबद्दल हीच परिस्थिती राज्य आणि देशात देखील आहे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले देशातील सर्व घटकांना, समूहांना सामावून
घेणारे संविधान बदलण्याचे षडयंत्र सुरु आहे. इंग्रजांशी अनेक दशकं लढल्या नंतर पारतंत्र्यातून अनेकांच्या बलिदाना नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. ते अबाधित रहायचे असेल तर लोकशाही वाचणे आवश्यक आहे. यासाठीच निर्भय बनो सभेचे आयोजन अहमदनगर येथे 20 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर लोकशाही बचाव मंचच्या वतीने 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झोपडी कॅन्टीन येथील माऊली सभागृह येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत तर प्रमुख पाहुण्या व वक्त्या निशाताई शिवूरकर यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे.

देशातील सद्यस्थिती याबद्दल आपली काही मतं आणि सूचना असतील तर सभागृहाच्य
प्रवेशव्दाराच्या ठिकाणी ठेवण्यात येणाऱ्या सूचना लिखित स्वरूपात असाव्यात आवाहनही यावेळी संयोजकातर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी अधिक काही माहिती मिळवण्यासाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत.
इंजि. सुजित क्षेत्रे | प्रा. डॉ. बापू चंदनशिवे विलास उबाळे ९१५८८८६८८८. ८९९९९८४४३३
९७६६०११००१
मंचाचा कार्यालयीन संपर्क क्रमांक ९९२२९१४२६४
अनिस चुडिवाला
९४२२३३५५३४

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular