अहमदनगर दि.१३ मार्च
अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये एका कांदा व्यापाऱ्याला जबर मारहाण करण्यात अलीअसून किरकोळ कारणावरून हा महाराणीचा प्रकार घडलाय तीन ते चार लोकांनी नितीन चिपाडे यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत नितीन चिपाडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
ही घटना आज दुपारी घडली असून नितीन चीपाडे या कांदा व्यापाऱ्याने त्यांच्या ओळखीच्या देसरडा नामक व्यक्तीबरोबर काही आर्थिक व्यवहार केले होते या आर्थिक व्यवहाराच्या बाबत चिपाडे हे जाब विचारला गेले असताना देसरडा याने सुपारी देऊन काही गुंड व्यक्तींना बोलवून नितीन चीपाडे यांना बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीमुळे नितीन चिपाडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आता आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती चिपाडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.