Homeशहरनायलॉन मांजामुळे दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या पोलिसाचा जीव गेला... आणि आज नगर जिल्हा...

नायलॉन मांजामुळे दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या पोलिसाचा जीव गेला… आणि आज नगर जिल्हा पोलीस दलातील पोलिसाचा जीव थोडक्यात वाचला… प्रशासनाचे डोळे कधी उघडणार नायलॉन मांजाची सर्रास विक्री..

advertisement

अहमदनगर दिनांक २७ डिसेंबर

मुंबईत मांजामुळे कामावरून घरी परत जाणाऱ्या एका पोलीसाचा गळा चिरल्याने मृत्यू झाला. ही घटना २४ डिसेंबर रोजी वाकोला पूलाजवळ घडली होती. या घटनेला दोन दिवस घडते नाही तोच आज पुन्हा अहमदनगर शहरातही एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव थोडक्यात वाचला आहे.नायलॉन चायना मांजा मुळे या पोलीस कर्मचाऱ्याच्या हनुवटीवर दहा टाके पडले असून दैव बलवत्तर म्हणून या पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला आहे.

जिल्हा पोलीस दलातील एसआयडी मध्ये कार्यरत असलेले सोमनाथ बेरड हे काही कामानिमित्ताने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेले होते तिथून निघून चांदणी चौकातून त्यांनी केडगाव कडे आपल्या घरी जाण्यासाठी आपली दुचाकी उड्डाणपुलाकडे वळवली आणि काही अंतर गेल्यावर उड्डाणपुलाच्या मधोमधच मांजा लागला हेल्मेट असल्यामुळे मांजा हेल्मेट वरून खाली सरकून हनुवटी पर्यंत गेला मात्र हेल्मेटवर काहीतरी हालचाल झाली म्हणून सोमनाथ बेरड यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला यामुळे मांजा हनुवटीवर जाऊन घासल्यामुळे त्यांची हनुवटी चांगलीच कापली गेली. मात्र दैवबलवत्तर म्हणून मांजा हनुवटी खाली गेला नाही अन्यथा गळ्यापर्यंत मांजा पोहोचला असता तर गळा कपण्याची शक्यता होती.जखमी झाल्या नंतर सोमनाथ बेरड यांनी खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले त्यांच्या हानवटीला पंधरा टाके पडले आहेत.

अहमदनगर शहरात चायना नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणावर आला असून संक्रांत सण जवळ आला असल्यामुळे हा मांजा सोशल मीडियावर स्टेटस ठेवून मांजा विक्रेते विकत आहेत. अत्यंत घातक आणि माणसासह पशुपक्षी प्राण्यांना हा चायना मांजा घातक आहे. या मांजर बंदी असातानाही हा मांजा चोरीछुपे विकला जातो मात्र आता पोलिसांनी आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अहमदनगर शहरात आलेले हजारो बंडल जाळून टाकून नष्ट करणे गरजेचे आहे कारण यामुळे एखाद्या कुटुंबातील व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास त्यांचा संसार घर उध्वस्त होऊ शकते..

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular