Homeशहरपोलीस प्रशासन आणि व्यापाऱ्यांची बैठक संपन्न पोलीस प्रशासन कडून चोऱ्या रोखण्यासाठी अनेक...

पोलीस प्रशासन आणि व्यापाऱ्यांची बैठक संपन्न पोलीस प्रशासन कडून चोऱ्या रोखण्यासाठी अनेक उपाय योजना राबवणार.. बीट मार्शल फिरण्यासाठी आमदार संग्राम यांच्यातर्फे दूचाकी गाड्या देण्याचे आश्वासन

advertisement

अहमदनगर दि.२८ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील मुख्य बाजार पेठीतील चोऱ्यांसह नगर शहरातील विविध ठिकाणी होत असलेल्या चोऱ्या आणि त्यांचा तपास लागत नसल्याने बाजारपेठेतील झाले होते या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी बाजारपेठेत उपोषणाचा इशारा दिला होता त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.

आज नगर शहरातील अडते बाजार असोसिएशन सभागृहात अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आमदार संग्राम जगताप व्यापारी असोसिएशनचे सचिव संतोष बोरा,कमलेश गांधी प्रा.माणिक विधाते,नगरसेवक अजिंक्य बोरकर , यांच्यासह अडते बाजार, कापड बाजार मधील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सर्व व्यापाऱ्यांना माहिती दिली. कापड बाजार मध्ये झालेल्या चोऱ्यांचे तपास अंतिम टप्प्यात असून त्यामधील आरोपी पकडण्यात आले असून काही आरोपी फरार आहेत .मात्र एक दोन दिवसात सर्व आरोपी पकडले जातील असा विश्वास पोलीस प्रशासनाने यावेळी दिला. तसेच तोफखाना पोलीस स्टेशन चे आणि कोतवाली पोलीस कर्मचारी संयुक्तपणे कापड बाजार आणि आडते बाजार मध्ये गस्त घालतील असे आश्वासन देण्यात आले. तसेच दर महिन्याला सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येईल आणि बीट मार्शल पथक स्थापन करून त्यांच्या फेऱ्या कापड बाजार परिसरातून वाढवण्यात येतील अशी माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. पोलीस प्रशासनावर अनेक मोर्चे, आंदोलन, यांचे बंदोबस्त असताना चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अनेक चोऱ्या उघडकीस येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची आवहान यावेळी व्यापाऱ्यांना करण्यात आले.

तसेच यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो मात्र सध्या लग्न सरायीचा काळ आहे. बाजार पेठेत गर्दी राहणार आहे अनेक महिला लग्नाला जाताना दागिने घालतात त्यावेळी होणाऱ्या चोऱ्या बंद घर पाहून होणाऱ्या चोऱ्या यासाठी पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे आहे आणि गल्ली बोळातून बीट मार्शल फिरवले तर चोरट्यांनी जरब बसेल आणि जर पोलीस प्रशासनाला बीट मार्शल फिरण्यासाठी गाड्यांची उपलब्धता नसेल तर त्या गाड्या देण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझी असून पोलिसांना माझ्या वतीने दुचाकी गाड्या देण्यात येतील असे आश्वासन यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी दिले. पोलिसांनी केलेली कारवाई आणि पुढील काळात चोऱ्या होणार नाहीत त्या दृष्टीने करण्यात येणारी कार्यवाही यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी आपले उपोषण स्थगित केले असल्याचं सांगितलय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular