Home राजकारण “मला न कळत शिंदे गटात सहभागी केलं” मात्र मला पुन्हा शिवसेनेत काम...

“मला न कळत शिंदे गटात सहभागी केलं” मात्र मला पुन्हा शिवसेनेत काम करायचं “ते” पत्र होतेय चांगलंच व्हायरल!

पुणे दि.२४ जुलै
पुणे तेथे काय उणे असं नेहमीच म्हणलं जातं सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच उलथा पालथ झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे गट तयार झाला आहे. त्यामुळे शिवसेनेत आणि एकनाथ शिंदे गटात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चांगलीच खेचाखेची सुरू आहे आज येथे तर उद्या तिथे अशी अनेक उदाहरणे राज्यातून समोर येत आहेत.

मात्र पुणे येथील एका शिवसेनेच्या विभागप्रमुखाने उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आपण त्यांच्यासोबतच असल्याचे सांगितले आहे .पुणे येथील झोपडपट्टी सेल विभाग प्रमुख याने दिलेल्या पत्रात आपली नकळत फसवणूक झाली असून आपल्याला नकळत शिंदे गटात नेण्यात आलं होतं मात्र मी पुन्हा आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्ष कार्य करणार असल्याचं पत्र त्याने थेट उद्धव ठाकरे यांना लिहिला आहे सोशल मीडियावर हे पत्र सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

पहा पत्राचा मायना

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version