पुणे दि.२२ मे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सभा होत असून सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी स्टेजवर आल्या नंतर मिळालेल्या माहितीनुसार या सभेला काही अंध मुलं सभेला आले आहेत हे कळले होते त्यांनी या मुलांना स्टेजवर बोलून घेऊन स्टेजवर स्थान दिलं.
तर भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सभागृहात का सभा घेतली याबाबत बोलत असताना सध्या निवडणुका नाहीत आणि पावसाचं वातावरण असल्याने त्यामुळे उगाच कशाला भिजत भाषण करायचं असा टोला त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता लगावला.
सध्या पायाच दुखणं जास्त आहे त्यावर एक जूनला शस्त्रक्रिया होणार आहे. पायाच्या दुखण्यामुळे कमरेला त्रास होतोय त्यामुळे दौरा रद्द झालाय हे सांगणं महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
माझा दौरा जेव्हा जाहीर झाला तेव्हा अयोध्येत येऊ देणार नाही अशी मोहीम सुरू झाली ज्या लोकांना माझी वारी खुपली होती ते सर्व अतृप्त आत्म्यांनी मिळून एक सापळा रचला आणि दौर्याच्या विरोधाला महाराष्ट्र रसद पुरवली गेली असा आरोपही राज ठाकरे यांनी विरोधकांचे नाव न घेता केली