Home क्राईम बनावट NOC प्रकरण गणेश अमोल गायबच तर राजा ठाकूर न्यायालयीन कोठडीत तर...

बनावट NOC प्रकरण गणेश अमोल गायबच तर राजा ठाकूर न्यायालयीन कोठडीत तर रोहित धेंडवाल दोन दिवसांच्या पोलीस कस्टडीत प्रिंटर,शिक्के हस्तगत पुढे काय?

अहमदनगर दि.१०ऑक्टोबर :

संरक्षण खात्याचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र (NOC) तयार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीं राजेंद्रसिंग देशराजसिंग ऊर्फ राजासिंग ठाकूर आणि रोहित धेंडवाल या दोघांना आज पोलीस कस्टडी संपल्यामुळे पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते मात्र या दोन आरोपींपैकी राजसिंग ठाकूर याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर रोहित धेंडवाल यास दोन दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे. रोहित कडून आतापर्यंत बनावट NOC साठी वापरण्यात येणारे कागद तसेच कलर प्रिंटर आणि शिक्के मिळून आले आहेत. मात्र या प्रकरणात महत्त्वपूर्ण असणारा त्याचा लॅपटॉप पोलिसांना हस्तगत करावयाचा आहे हा लॅपटॉप हस्तगत झाला तर काही धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात असा पोलिसांचा अंदाज आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

हे प्रकरण संरक्षण व महसूल खात्याशी संबंधित असल्याने हा तपास उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तर या प्रकरणात संरक्षण खात्यामधील एक कर्मचारी आणि एक खाजगी इसम पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र महसूल विभागाशी संबंधित लोक अद्यापही पोलीस तपासात समोर आले नाहीत हे विशेष कारण राजसिंग ठाकूर आणि रोहित धेंडवाल यांच्यात आणि महसूल विभागा मध्ये मध्यस्थीचे काम काही एजंट करत होते. हे एजंट सध्या कुठे गायब आहेत कारण या सर्व प्रकरणांमध्ये करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे. या प्रकरणात गणेश नावाच्या एजंटला पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते त्याच्याकडून अनेक धक्कादाय गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र हा गणेश सध्या कुठे आहे तर या प्रकरणात अमोलची चौकशी झाली आहे. मात्र गणेश,अमोल आणि त्याचे सारखे इतर काही लोक सध्या पडद्यामागे गेले आहेत. या सर्व लोकांची चौकशी केल्यास मोठा आर्थिक घोटाळा आणि साखळी उघडकीस येऊ शकते.

.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version