Home राजकारण राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार ?

राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार ?

मुंबई दि. २२ मे

राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे कर संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली होती तसेच राष्ट्रवादी अथवा शिवसेना यांनी पाठिंबा देण्यापेक्षा हा विकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी ही विनंती त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केली होती.

मात्र आता संभाजी राजे हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.संभाजीराजे यांच्याकडे शिवसेनेने एक शिष्टमंडळ पाठवले होते शिवसेनेचे अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, उदय सामंत यांनी ट्रायडंट हॉटेलमध्ये संभाजीराजेंसोबत बैठक घेतली या बैठकीत संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्याचं ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version