Homeक्राईमशाळेलागतचे अवैद्य धंदे बंद केल्याच्या रागातून निर्भय बनो सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी...

शाळेलागतचे अवैद्य धंदे बंद केल्याच्या रागातून निर्भय बनो सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला सिसी टिव्ही व्हायरल

advertisement

अहमदनगर दि.९ ऑक्टोबर

अहमदनगर शहरातील निर्भय बनवण्याचे कार्यकर्ते आणि सिताराम साडा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक हिरण कुलकर्णी यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला आहे यामुळे सामाजिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून शनिवारी दुपारी अज्ञात लोकांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात हेरम कुलकर्णी यांच्या डोक्यावर चार टाके पडले आहेत मात्र काळजी करण्याचे कारण नसल्याचे मॅक केअर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत पटारे यांनी सांगितलय.

राज्यातील शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेले आणि ‘निर्भय बनो’ चळवळीतील हेरंब कुलकर्णी हे कार्यकर्ते आहेत. शाळेलगतच्या विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणार्‍या बेकायदेशिर सिगारेट, तंबाखू विक्रीच्या पानटपर्‍या महानगरपालिकेच्या पाठपुराव्याने काढून टाकल्या होत्या. त्यामुळेच हल्ला झाला असावा असा संशय हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलाय

या प्रकरणाची वाचता झाल्यानंतर आता अहमदनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि विविध पक्षांचे कार्यकर्त्यांनी हेरंब कुलकर्णी यांना भेटण्यासाठी धाव घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी हेरंब कुलकर्णी यांची भेट घेऊन तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर पकडावे यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे आणि अशा घटना घडू नये म्हणून गुंडांवर कारवाई करावी अशी मागणी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्याकडे केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular