नवी दिल्ली दि.१० ऑक्टोबर :
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत.
चिन्हाबाबतही निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर, चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत.
निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांना मोठा धक्का बसला होता त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपापल्या पक्षांची नावे आणि चिन्ह देण्याबाबत कळवले होते त्यानुसार दोन्ही गटांच्या वतीने निवडणूक आयोगाला नावे दिली होती. त्याचा निर्णय आज झाला आहे. मात्र दोन्ही गटाला शिवसेना नावाची भुरळ असून आता नवीन नाव आणि नवीन चिन्ह हे शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी दोन्ही गटांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे येणारा काळ हा दोन्ही गटांसाठी संघर्षाचा आणि शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठी प्रयत्नांचा असणार आहे.