Home क्राईम शिवसेनेच्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल

शिवसेनेच्या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल

पारनेर दि.२३ ने
पारनेर येथील शिवसेनेचे नगरसेवक युवराज पठारे तसेच शुभम देशमुख मयूर चौरे आणि गणेश पठारे यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारनेर तालुक्यातील तराळवाडी येथील प्रवीण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून खंडणी मारहाण करणे धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरमहा १५ हजार रुपये खंडणी दे अशी मागणी नगरसेवक युवराज पठारे शुभम देशमुख आणि त्याचे साथीदार प्रवीण गायकवाड यांना करत होते मात्र प्रवीण गायकवाड यांनी पैसे दिले नसल्याने प्रवीण गायकवाड यांना वेळोवेळी समक्ष तसेच फोनवर धमकी देऊन आरोपींनी पैशाची मागणी केली होती.


१३ मे रोजी प्रवीण गायकवाड हे स्वतःची मलवाहू ट्रक घेऊन मुंबईकडे निघाल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास युवराज पठारे, शुभम देशमुख, मयुर चौरे व गणेश पठारे यांनी ट्रक अडविली. ट्रकखाली ओढून मारहाण केली. शुभम देशमुख याने खिशातील 30 हजार रूपये, गळयातील चेन काढून घेतली. शिविगाळ करीत गावात आमच्या शब्दाच्या पुढे कोणी जात नाही, तु आम्हाला क्रॉस जातो का, असे म्हणाले. देशमुख याने ट्रकमधील चेकबुकही काढून घेतले. त्यातील काही चेकवर सह्या केलेल्या आहेत. पैसे दिले नाही तर जीवे मारून टाकू, तुझ्या गाडया अजिबात चालू देणार नाही अशी धमकी युवराज पठारे व शुभम देशमुख यांनी दिली.

या प्रकारानंतर प्रवीण गायकवाड यांनी फोनवरून आपले पैसे व चेक देण्यासाठी सदर आरोपींकडे मागणी केली होती मात्र त्यांनी नंतर पाहू असे सांगून याबाबत बोलणे टाळले याबाबतचा तक्रार अर्ज प्रवीण गायकवाड यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्याकडे दिला होता या तक्रार अर्जाची चौकशी झाल्यानंतर आपण फिर्याद दाखल करीत असल्याचे गायकवाड यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version