Homeराजकारणशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती थांबेना... ऊ बा ठा शिवसेनेच्या एका...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गळती थांबेना… ऊ बा ठा शिवसेनेच्या एका नगरसेवकाने घेतली एकनाथ शिंदे यांची भेट लवकरच होणार पक्ष प्रवेश

advertisement

नगर दिनांक 18 जानेवारी
नगर शहरातील ऊबाठा शिवसेनेला गळती लागले असून काही दिवसांपूर्वी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे काही माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये म्हणजेच एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झाले आहेत. तर काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी वेट अँड व्हाट्सअप भूमिकेत आहेत प्रत्येक पदाधिकारी आणि नगरसेवक आपापल्या परीने मुंबईमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेत असून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होईल अशी सूत्रांची माहिती आहे.

पूर्वस्वामीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आज मुंबई येथे जाऊन माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीमागे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेब बोराटे यांचा प्रवेश होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही सदिच्छा भेट होती मात्र अजूनही प्रवेशा बाबत कोणतीही चर्चा नसल्याचं बाळासाहेब बोराटे यांनी सांगितले असले तरी महानगरपालिकेची निवडणूक न्यायालयाच्या निकालानंतर कोणत्याही क्षणी लागू शकते त्यामुळे आता प्रत्येक जण कामाला लागला असून आपापल्या परीने प्रत्येक जण विविध पक्षांची चाचपणी करत आहे.

नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणारा मतदार संघ होता मात्र आता या किल्ल्याला आमदार संग्राम जगताप यांनी सुरुंग लावला असून आमदारकीसह महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी टक्कर शिवसेनेला दिली होती मात्र आता याच शिवसेनेला घरघर लागली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular